बाळ बोठेची अवैद्य संपत्ती जप्त करा. शहरात कोट्यवधींची जमीन, पुणे-नगरमध्ये हॉस्पिटलमध्ये पार्टनरशिप; अनेक व्यवसायात छुपी भागीदारी.वाचा सविस्तर... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

बाळ बोठेची अवैद्य संपत्ती जप्त करा. शहरात कोट्यवधींची जमीन, पुणे-नगरमध्ये हॉस्पिटलमध्ये पार्टनरशिप; अनेक व्यवसायात छुपी भागीदारी.वाचा सविस्तर...

 बाळ बोठेची अवैद्य संपत्ती जप्त करा. 

शहरात कोट्यवधींची जमीन, पुणे-नगरमध्ये हॉस्पिटलमध्ये पार्टनरशिप; अनेक व्यवसायात छुपी भागीदारी.

अ‍ॅड सुरेश लगड यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे मागणी.

नगर जिल्ह्यातील पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. शहर प्रतिनिधीपासून ते संपादक, कार्यकारी संपादक या पदांवर अनेक पत्रकार पोहोचले. पण पत्रकारिता कधी बदनाम झाली नाही. जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरवशाली इतिहास असताना बाळ बोठेसारखा पत्रकार कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमा करू शकत असेल तर यास जबाबदार कोण? बोठेच्या ब्लॅकमेलिंग व हनीट्रॅप, खुनाची सुपारी देण्याबाबत आज त्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे, पत्रकार प्रसिध्दीमाध्यमांमधून टाहो फोडीत आहेत. बोठेंना पाठीशी घालणारे पत्रकार, प्रशासनातील अधिकारी, राजकीय नेते, तुम्ही-आम्ही सर्वजण जबाबदार नाही का? आज एक बोठे ओपन झाला. उद्या आणखी कोणी दुसरा बोठे उजेडात येण्यापूर्वी सर्वांनी अशा प्रवृत्तींच्या बिजांचा वृक्ष होण्यापूर्वी त्यास रोखणे गरजेचे आहे. आजही काही बोठे पत्रकारितेत आहेत. त्यांचा पर्दाफाश कोण करणार? हा खरा प्रश्न आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरमधील भिस्तबागमध्ये 7 एकराचा प्लॉट, भिंगार येथे 5 एकर जमीन, सावेडीतील एल अँड टी क्लबजवळ 17 एकर क्षेत्र, अहमदनगर, पुणे येथील हॉस्पिटलमध्ये तसेच राज्यातील अनेक संस्थांमध्ये पार्टनर अशी 500 कोटींच्यापुढे संपत्ती कमविणार्‍या पत्रकार बोठेच्या बेहिशोबी संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करावी, अशी मागणी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पोलिस प्रशासनाने बोठेच्या बँक खात्यावर टाच आणली असताना तो 3 महिने फरार होता. मग त्याच्याकडे खर्चासाठी पैसे कोठून आले? सकाळ वर्तमानपत्राने त्यास काढून टाकले म्हणजे त्याला पगार नाही मग त्याच्याकडे पैसे कोठून आले? आज बोठे वकिलाचा खर्च करत आहे ते तो कुठून आणत आहे. बोठे याचा पत्रकारितेतील प्रवास, त्याला तेथे मिळत असलेले उत्पन्न आणि त्याच्याकडे असलेली संपत्ती, बेहिशोबी मालमत्ता याचा तुलनात्मक अभ्यास करून त्याची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात यावी. अनेक व्यवसायांत तो छुपा भागीदार (स्लिमिंग पार्टनर) आहे याचीही चौकशी करण्यात यावी.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना दिलेल्या निवेदनात अँड लगड यांनी म्हटले आहे की, अहमदनगर येथील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडामधील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे यांच्याकडे असलेले अपसंपदेची आपल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने उघड चौकशी करावी अशी मागणी आपणाकडे जनहितार्थ मी करत आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात मुख्य सूत्रधार म्हणून अहमदनगर येथील दैनिक सकाळ या वृत्तपत्राचा अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ जगन्नाथ बोठे यास अहमदनगरच्या आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी मोठ्या शिताफीने अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. या बोठेचे नाव पोलीस तपासात निष्पन्न होऊन जवळपास 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही हा महाशय फरार झाल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. आता अथक प्रयासानंतर तो पोलिसांना सापडला अशा परिस्थितीत याची आपल्या अधिपत्याखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत उघड चौकशी होणे आवश्यक आहे.

बाळ बोठे याने अगदी सुरुवातीस प्रेस फोटोग्राफर म्हणून वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम केलेले होते. त्यानंतर बातमीदार म्हणून काम केले, दैनिक सकाळ या वृत्तपत्रात सहाय्यक बातमीदार म्हणून, त्यानंतर मुख्य बातमीदार म्हणून, त्यानंतर निवासी संपादक व शेवटी कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले आहे. एक प्रेस फोटोग्राफर म्हणून सुरुवात केलेल्या या व्यक्तीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम केलेले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा बाळ झटपट (आर्थिक दृष्ट्या) इतका मोठा झाला की विचारता सोय नाही. या बाळ बोठेची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती काय होती व आत्ताची आर्थिक परिस्थिती काय आहे? याची सखोल चौकशी आपल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली तर अनेक धक्कादायक बाबी उघड होवू शकतील? बोठेंचे उत्पन्न व त्याच्या कडे असलेली ज्ञात-अज्ञात, जंगम मिळकत, कॅश रक्कम याची बारकाईने चौकशी केली तर पत्रकारिता क्षेत्रातील ही व्यक्ती इतक्या झटपट श्रीमंत कशी होऊ शकते? व त्यास भरीव असे उत्पन्नाचे कोणते साधन होते की एवढी प्रचंड माया गोळा करू शकला? असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here