आणखी 4 मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

आणखी 4 मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित

 आणखी 4 मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित

गेल्या 24 तासांमध्ये 660 कोरोना रुग्ण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोजच वाढतोय. काल जिल्ह्यात 456 कोरोणा रुग्ण आढळून आल्यानंतर आणखी चार मायक्रो कंटेनमेंट झोन महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये बालिकाश्रम रोड बसंत विहार बिल्डिंग शेजारील रस्ता, शहर गावठाण भागातील नांगरे गल्ली येथे न्यू सौरभ एजन्सी ते एडवोकेट काकडे ते नमो एजन्सी पर्यत, तसेच सावेडी भागातील सावली सोसायटी गुलमोहर रोड येथील आल्हाट यांचे घर ते लोंढे यांचे घर व आगरकर मळा भागातील समर्थ कॉलनी मध्ये अशोक जैन घर ते प्रल्हाद जोशी घर ते  गोसावी घर असे चार मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 660 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.04 टक्के इतके झाले आहे.  जिल्ह्यात कोरोनाचा कहर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.  नगर शहरात 238 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. नगर शहरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र देखील वाढले. नगर शहरात आतापर्यंत 19 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र झाले आहेत. याशिवाय कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आज जिल्हा दौर्‍यावर आहेत. हा दौरा जिल्ह्यासाठी निश्चित निर्णायक ठरेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
नगर शहर 238, राहाता 77, संगमनेर 57, कोपरगाव 35, नेवासे 31, पाथर्डी 31, राहुरी 27, नगर तालुका 26, श्रीरामपूर 23, कर्जत 22, पारनेर 19, भिंगार शहर 18, अकोले 16, शेवगाव 14, जामखेड 12, श्रीगोंदे 07, इतर जिल्ह्यातील 07 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरालगत असलेल्या कॅटोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत असलेल्या भिंगार शहरात देखील कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे. भिंगार शहरात गेल्या 24 तासांमध्ये 18 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेनुसार 231, खाजगी प्रयोगशाळेनुसार 349 आणि रॅपिड चाचणीनुसार 80 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.

No comments:

Post a Comment