बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये शासनाकडून मंजूर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये शासनाकडून मंजूर.

 बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी  400 कोटी रुपये शासनाकडून मंजूर.


मुंबई ः
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरात हे स्मारक होणार आहे. आज (1 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या निधीस मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
मुंबई महापौर यांच्या निवसास्थानाच्या परिसरात होणार्‍या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आज 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अद्ययवतीकरणावपर काम केले जाईल. राज्य सरकारकडून बाळासाहेबांच्या स्मारकासाठी दुसर्‍या टप्प्यात 150 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात तंत्रज्ञानविषयक कामं केली जाणार आहेत. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो आणि  तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना ही कामं केली जातील
दरम्यान, पहिला आणि दुसऱा टप्पा मिळून एकूण 400 कोटींचा खर्च होणे राज्य सरकारला अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणारा 400 कोटींचा खर्चा सुरुवातीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here