क्रमिक शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रातही करियरच्या चांगल्या संधी : मानधना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

क्रमिक शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रातही करियरच्या चांगल्या संधी : मानधना

 क्रमिक शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रातही करियरच्या चांगल्या संधी : मानधना

दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक छायाचित्रण कलेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः क्रमिक शिक्षणाशिवायही इतर अनेक क्षेत्रात चांगले करियर घडवता येते. छायाचित्रण कला आत्मसात केली तर खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात मिळणारे नियमित अभ्यासाव्यतिरिक्तचे शिक्षण आता नगर शहरातही मिळत आहे. श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशन अशा नाविन्यपूर्ण शिक्षणाला सातत्याने प्रोत्साहन देत असते. याअंतर्गत विद्यार्थ्यांना छायाचित्रण कलेचा प्रात्यक्षिकांसह अनुभव देण्यात आला असून आवडीचे क्षेत्र निवडून त्याव्दारे स्वत:च व्यवसाय सुरु करून स्वमालक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन श्री रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनचे उपाध्यक्ष  मोहनलाल मानधना यांनी केले.
श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या सेठ नंदलाल धूत आणि मोहनलाल रामअवतार मानधना कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी छायाचित्रणाबाबत विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मानधना बोलत होते. या कार्यक्रमात छायाचित्र, चित्रपट निर्मिती क्षेत्रात नावाजलेल्या इल्युमिनंट संस्थेचे संस्थापक अभिमन्यू ओबेरॉय यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ओबेरॉय यांनी कौन बनेगा करोडपती या शोसाठीही छायाचित्रणाचे काम केले आहे.
ओबेरॉय म्हणाले, की प्रत्येक पालकाला आपला पाल्य डॉक्टर किंवा इंजिनइर व्हावा असे वाटते.परंतु, या व्यतिरिक्तही अनेक क्षेत्र आहेत, ज्यात मोठे यश मिळू शकते. दहावीनंतर विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातही करियरच्या अनेक संधी आहेत. ज्यामध्ये मान व धन दोन्ही मिळू शकते. फोटोग्राफीमध्ये आधुनिक तंत्र आलेले आहे. त्यामुळे तुमच्यात उपजत कलागुण असतील तर या क्षेत्रातही उत्तम काम करता येते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ओबेरॉय यांनी फोटोग्राफीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देत उपस्थितांन मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनीही या आगळ्यावेगळ्या व्याख्यानाचा आनंद घेतला. यावेळी प्राचार्या राधिका जेऊरकर,  संपदा देशपांडे, सावित्री पुजारी, अंजना पंडीत उपस्थित होत्या. सदर उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, सचिव डॉ.शरद कोलते, सहसचिव राजेश झंवर, संस्थेचे सदस्य बजरंग दरक, प्राचार्या राधिका जेऊरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment