कृषी पंप वीजबील भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रमाणपत्र देऊन केले सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

कृषी पंप वीजबील भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रमाणपत्र देऊन केले सन्मानित

 कृषी पंप वीजबील भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रमाणपत्र देऊन केले सन्मानित


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 मध्ये बेलवंडी महावितरण उपविभागात शेतीपंपाच्या बिलाचा भरणा करणार्‍या शेतकर्‍यांना उपकार्यकारी अभियंता गहाडुळे एस.ए यांच्या हस्ते थकबाकी मुक्त असण्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 अंतर्गत बेलवंडी महावितरण उपविभागात 90 लाख रुपये वीज बिलांचे भरणा केलेल्या सुमारे 180 शेतकरी ग्राहकांना थकबाकी मुक्त असण्याचे प्रमाणपत्र उपकार्यकारी अभियंता गहाडुळे एस.ए यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी बोलताना गहाडुळे यांनी कृषी पंप ग्राहकांना कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 अंतर्गत येणार्‍या शेती पंपाच्या बिलात मिळणार्‍या सवलतीचा लाभ घ्यावा व थकबाकी मुक्त व्हाव असे आवाहन केले यावेळी सहायक अभियंता बावस्कर आर.टी. सिनियर तंत्रज्ञ दिपक गुंड, साबणे दुर्गेश यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here