बागडेंचे आमदार कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

बागडेंचे आमदार कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करणार

 बागडेंचे आमदार कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करणार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः खोट्या कागदपत्रांच्या आधारे संस्थेने बळकावलेली जमीन परत मिळावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर बागडे पिता-पुत्र हे दुसर्यांदा उपोषणास बसणार आहेत. या पुर्वी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र दोन महीन्यांनंतर देखील कसलीही कारवाई न झाल्यामुळे पुन्हा हे उपोषण करण्याचा इशारा या पिता पुत्रांनी दिला आहे.
संत गजानन महाराज महाविद्यालयसह दोन महाविद्यालयाच्या संस्थेविरोधात आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर श्रीराम बागडे व गौरव बागडे पिता पुत्र  दि 1 डिसेंबर रोजी  उपोषणाला बसले होते. या प्रकरणाला तीन महिने झाले कसलीही चौकशी केली नाही मंडलाधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास 15 दिवसात सादर करण्याचे तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र दोन महिने झाले तरी कसलीही चौकशी केली नाही, न्याय देण्याची मानसिकता नाही त्यामुळे पुन्हा आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर दुसर्यांदा उपोषणास बागडे पिता - पुत्र हे बसणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस अधीक्षक अहमदनगर, प्रांताधिकारी, तहसीलदार जामखेड, पोलीस निरीक्षक जामखेड व आमदार कार्यालयाला निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की सदर संस्था चालकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्ताऐवज तयार करून महाविद्यालयासाठी शासनाकडून परवाना घेतला. शासनासह मुळ जागा मालकाची फसवणुक केल्याप्रकरणी खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसार मंडळ या संस्थेच्या संचालक मंडळाविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे. या शिक्षण संस्थेच्या सोनेगाव रोडवरील तीन महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी.  सदर संस्था चालक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आसल्याने आम्हाला त्रास देऊ शकतात. त्यांचे राजकीय पक्षांशी घनिष्ट संबंध असल्याने आमच्या मागणीची प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे न्यायासाठी प्रशासनाला वैतागून आम्ही मुळ जागामालक श्रीराम बागडे व गौरव बागडे रा खर्डा दि 15 मार्च रोजी आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. आमच्या कुटुंबास उपोषणस्थळी काही झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहिल असे ही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment