लाच घेताना तलाठी रंगेहाथ पकडला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 3, 2021

लाच घेताना तलाठी रंगेहाथ पकडला

 लाच घेताना तलाठी रंगेहाथ पकडला


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः कुटुंब शेती वाटप पत्रासाठी,4500 हजारांची करुन तडजोड करू तीन हजार मागितले प्रकरणी मोराळा सज्याचे तलाठी बाळासाहेब बनगे यांना लाच लुचपत विभाग बीड यांच्या पथकाने मंगळवार दिनांक दोन मार्च या दिवशी दुपारी एक वाजता शेतकर्‍याच्या तक्रारीवरून आष्टी येथील तलाठी कार्यालयात कारवाई करून पकडले.
याबाबत माहिती अशी की मोराळा येथील शेतकर्‍याला मोराळा सजाचे तलाठी बाळासाहेब महादेव बनगे यांनी अनुदान मिळवून देतो व कुटुंबातील आई-वडील भाऊ-बहीण यांच्या नावे शेती वाटप पत्रासाठी 4500मागणी केली होती तडजोड करून 3000 स्वीकारण्याचे ठरल्यानंतर दिनांक 29 रोजी मंगळवार दुपारी एक वाजता तलाठी कार्यालयात बीड लाचलुच  पथकाने कारवाई करून लाच मागणी केल्याप्रकरणी पकडले.ही कारवाई बीड विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी यांनी तसेच श्रीराम गिराम,संतोष मोरे,भारत गारदे या पथकाने केली आहे.
याप्रकरणी आरोपींच्या विरोधात आष्टी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया चालू आहे. आष्टी तहसील च्या अंतर्गत येणार्‍या सर्व सज्जा वर आश्याप्रकारे देवान-घेवान नीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात काय सुरू असते या अगोदर लाचलुचपत विभागाने अनेक कारवाई केल्या आहेत.मात्र तरी देखील कायमच असे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र या कारवाईमुळे तहसील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

No comments:

Post a Comment