शिवछत्रपती कुस्ती संकुलातील मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 3, 2021

शिवछत्रपती कुस्ती संकुलातील मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 शिवछत्रपती कुस्ती संकुलातील मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर तालुक्यातील शिव छत्रपती कुस्ती संकुलन पारनेर येथील मल्लांनी मा.पै युवराजदादा पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून महाराष्ट्र केसरी जिल्हास्तरीय निवड कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली व त्यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.पै.प्रविण सरक - सातारा जिल्ह्यातुन महाराष्ट्र केसरी किताबासाठी निवडपै.अनिल ब्राह्मणे-97 किलो मॅट विभाग अहमदनगर जिल्ह्यातुन निवड पै.अनिल लोणारे - 97 किलो माती विभाग अहमदनगर जिल्ह्यातुन निवडपै.मच्छिद्र भुईर  97 किलो मॅट विभाग हिंगोली जिल्ह्यातुन निवडपै.ऋषिकेश लांडे - 86 किलो मॅट विभाग अहमदनगर जिल्ह्यातुन निवड
पै.विकास सासवडे - 86 किलो मॅट विभाग बीड जिल्ह्यातून निवड वरील सर्व पैलवानांची महाराष्ट्र केसरी साठी निवड झाल्याबद्दल पारनेर परिसरातून नव्हे तर जिल्ह्यातून सर्व स्तरावरून कौतुक होत आहे शिव छत्रपती कुस्ती संकुलनाचे संचालक व पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष मा.पै. युवराजदादा पठारे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या..
महाराष्ट्रातील अद्यावत असे सर्व प्रकारच्या व्यवस्था असलेले कुस्ती संकुलन पारनेर तालुक्यात 2 वर्षा पासून सुरू आहे.
तालमीतील सुविधा- कोच, मातीचा प्रशस्थ आखाडा, इंटरनॅशनल लेवल च्या मॅट, व्यायामासाठी सुसज्ज जिम, राहाण्याची स्वतंत्र व्यवस्था, गावरान तुपातील जेवणाची उत्तम सोय, संकुलनासमोर प्रशस्थ असे मैदान, संकुलना पासून 200 मीटर अंतरावर शैक्षणिक शाळेची सोय, मल्लांसाठी लागणारे दूध व खुराकाची व्यवस्था तालमी शेजारीच आहे अशी माहिती शिव छत्रपती कुस्ती संकुलनाचे संचालक व पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै. युवराजदादा पठारे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here