बाळ बोटेला पुन्हा मिळाली इतक्या दिवसांची पोलीस कस्टडी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

बाळ बोटेला पुन्हा मिळाली इतक्या दिवसांची पोलीस कस्टडी

 तपास अपूर्ण असल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा

बाळ बोटेला आणखी दोन दिवसांची पोलीस कस्टडी



नगरी दवंडी

अहमदनगर-  रेखा जरे हत्याकांड  प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठे फरार कालावधीत कोठे होता.हैदराबाद मध्ये जाण्यासाठी त्याला कोणी मदत केली. आरोपीस हैदराबाद मधील अनंतलक्ष्मी सुब्बाचारीने काय सहकार्य केले. हत्येची सुपारी का दिली इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने बाळ बोठेच्या आणखी पोलीस कस्टडीची मागणी न्यायालयाकडे केली असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

बाळ बोठेच्या पोलिस कस्टडीची मुदत संपल्याने  त्यास आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी होती. प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोठेला आज न्यायालय पोलिस कस्टडी की न्यायालीन कस्टडी देईल याबाबत चर्चा सुरू होती.


आरोपीच्या वकिलांनी आरोपी बारा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. या काळात आरोपीने त्याचेकडे जी माहिती होती ती पोलिसांना दिली आहे.आरोपीस आणखी कस्टडी देण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य न करता आरोपीस आणखी दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.



No comments:

Post a Comment