जलक्रांतीतून हरितक्रांती निर्माण होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 23, 2021

जलक्रांतीतून हरितक्रांती निर्माण होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 जलक्रांतीतून हरितक्रांती निर्माण होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पाणी फौडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये आदर्शगाव मांजर सुंभा गावचा गुणगौरव संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सर्वसामान्य माणसाला जोपर्यत आपलेपण वाटत नाही तोपर्यंत शासनाच्या योजना कागदावरच दिसतील यासाठी प्रशासनाने सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. पाणी फौडेअशने गेल्या पाच वर्षामध्ये गावोगावी जाऊन लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण केली. व पाण्याचे महत्त्व समाजाला पटवून दिले. यामुळे जलक्रांतीतून हरीत क्रांती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. गोवोगावी जलसाक्षारता निर्माण केली. शिक्षणाच्या बरोबरीने संस्कारही महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा र्‍हास झाल्यामुळे अनेक संकटे आपल्यावर येत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पाण्याचे महत्त्व खुप मोठे आहे हे पटवून देण्याचे काम पाणी फौंडेशन करत आहे. पाणी फौडेशनचे अमीर खान व किरण रॉय यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून पुढे येऊन समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पाण्याचे महत्त्व गोवोगावी पोहचविण्यासाठी सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे. असे प्रदिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
   पाणी फौडेअशनच्या वतीने मुबई येथील (वर्षा बंगल्यावर) ऑनलाईने पद्धतीने समृद्ध गाव स्पर्धेच्या गुणगौरव सोहळ्या प्रंसगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी पाणी फौडेशअनचे अमीर खान व किरण रॉय, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यचे मुख्य सचिव सिताराम कुटे, पाणी फौडेअशनचे सी.ई.ओ. संत्यजीत भटकर, डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते.
   आमीर खान म्हणाले की, पाच वर्षापूर्वी आम्ही एक स्वप्न पाहिले होते की, आपले राज्य पाणीदार व्हावा या दृष्टीकोनातून आम्ही पावले उचलली व सर्व गावांना एकत्र करून लोकसहभागातून कामे सुरू केले. पुढील काही काळात सपूर्ण राज्यभर हे अभियान राबवणार आहोत. या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
   विक्रम फाटक म्हणाले की, समृद्ध गाव स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील नगर तालुका, पारनेर तालुका, व संगमनेर तालुक्यातील 89 गावांनी समृद्ध गाव स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या मधील 26 गावांनी चांगले काम केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित या गावांचा गुणगौरव करण्यात आला लवकरच जिल्हा अधिकारी याच्या हस्ते या गावांना स्मृतीचिंन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. नगर तालुक्यातील आदर्शगाव मांजरसुंभा येथे ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.
   जांलिदर कदम म्हणाले की, मांजरसुंभा गावाने पाणी फौडेअशनच्या समृंद्ध गाव स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आम्ही बक्षिसासाठी काम करीत नसून गावच्या विकासासाठी काम करत असतो. केंद्र व राज्यसरकारच्या विविध पुरस्काराबरोबरच पाणी फौडेअशचा पुरस्कार मिळविला आहे. हे सर्व शक्य होते गावच्या एकजुटीमुळेच.
   यावेळी सरपच मगंल कदम, उपसरपंच जालिंदर कदम, रूपाली कदम, जलमित्र नामदेव कदम, विलास भुतकर, पांडुरंग कदम, भाऊसाहेब कदम, प्रशांत कदम, इद्रभान कदम, पाणी फौडेअशनचे विभागीय समन्वयक विक्रम फाटक, तालुका समन्वयक दिलीप कातोरे, कृषी साह्ययक अभिजित डुकरे, ग्रामसेवक सुरेश सौदागर, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here