फक्त एवढंच सांगा? ऑडिओ क्लिप खर्‍या की खोट्या? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

फक्त एवढंच सांगा? ऑडिओ क्लिप खर्‍या की खोट्या?

 फक्त एवढंच सांगा? ऑडिओ क्लिप खर्‍या की खोट्या? 

फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना परखड सवाल!

मुंबई ः मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढं सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खर्‍या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं? पण एवढं झाल्यावरही जर कोणाला साधूसंत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं, असा परखड सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आणि अधिवेशनात हा मुद्दा गाजणार हे स्पष्ट झालं. पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here