शिर नसलेला मृतदेह कुत्र्याने उकरून काढला! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

शिर नसलेला मृतदेह कुत्र्याने उकरून काढला!

 टाकळी कडेवळीतील खुनाचे गुढ पोलीस उकलणार?

शिर नसलेला मृतदेह कुत्र्याने उकरून काढला!

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणार्‍या माळरानावर काल सायंकाळी काही कुत्र्यांने  शिर नसलेले एक मृतदेह उकरून काढल्याचे परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिस निरिक्षक रामराव ढिकले याना माहिती दिली. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याची प्राथमिक शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी भेट देवून पाहणी केली आहे.
       याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणार्‍या माळरानावर एका पुरुषाचा शिर नसलेला मृतदेह कुत्र्याने उकरून काढला. मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे आसपास राहणार्या लोकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्ष राजुळे घटनास्थळी दाखल झाले.  
    पुरलेला मृतदेह पुरुषाचा असून त्याचे शिर घटनास्थळी आढळलेले नाही. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट असून राखाड्या रंगाची पॅन्ट आहे. मयत पुरुष उंच असून शरीरयष्टी मजबूत आहे. मृतदेहाचे शिर घटनास्थळी आढळून आले नसल्याने हा खुनाचाच प्रकार असण्याची अधिक शक्यता पोलीस यंत्रणेकडून व्यक्त होत आहे. दरम्यान या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून हा मृतदेह येथेच खून करून पुरला का,  दुसरीकडे खून केल्यानंतर मृतदेह येथे आणून पुरला, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा आहे. खून झाला असेल तर त्यामागील कारण आदींचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.             शवविच्छेदनानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे. श्रीगोंदा पोलिसांची पथके टाकळी कडेवळीत परिसरात मृतदेहाचे शिर शोधण्यासाठी रवाना झाली असून सदरील मृतदेहाबाबत नागरिकांना माहिती असल्यास श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here