’थिंक ब्रँडेड’ जोडेल मनाचं नातं मनाशी ः पाळणकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

’थिंक ब्रँडेड’ जोडेल मनाचं नातं मनाशी ः पाळणकर

 ’थिंक ब्रँडेड’ जोडेल मनाचं नातं मनाशी ः पाळणकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः नगर जिल्ह्याचे सुपुत्र अवधुत राऊत आणि ग्रुपच्या थिंक ब्रँडेड प्रमोशन्सचे नुकतेच अनावरण करण्यात आले. राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्व, कंपनी, विविध संस्था यांची ब्रँडिंग व मिडिया प्लॅनिंग ठरवण्यासाठी ही कंपनी काम करणार आहे. तसेच सेलिब्रिटी मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट इव्हेंट प्लॅनिंग क्षेत्रात देखील ही कंपनी कार्यरत राहील.
   उदघाटन समयी बोलताना थिंक ब्रँडेडच्या ब्रँड अँबेसिडर विख्यात निवेदिका यशा पाळणकर म्हणाल्या की, अवधुत राऊत यांनी सुरू केलेला हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी आहे. येणार्‍या काळात थिंक ब्रँडेड प्रमोशन्स आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांच्या पसंतीस उतरेल. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या बाबतीतच बोलायचं झालं तर ही फर्म आपल्या दृष्टीने भूषणावह आहे. थिंक ब्रँडेड ही मनाचं मनाशी नातं जोडणारी, खांद्याला खांदा देणारी एक सहकारी युनिट आहे. या फर्मला आगामी काळात उच्च मानांकन  लाभेल.
    यावेळी थिंक ब्रँडेडच्या माहीती पुस्तिकेचे अनावरण युवा उद्योजक समिर गायकवाड, देवल गायकवाड, तसेच प्राचार्य अमोल खेडकर व प्रा.सुजाता खेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रभान ठुबे, संतोष ओहोळ, विशाल सकट, कुमार लोखंडे, शशिकांत पाचपुते, निसार शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here