कर्जत जामखेड पोलीस वसाहतीचे गृहमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

कर्जत जामखेड पोलीस वसाहतीचे गृहमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन..

 कर्जत जामखेड पोलीस वसाहतीचे गृहमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन..

पोलीस तपासासाठी सीसीटीव्ही, मोबाईल महत्त्वाचे !- शंभूराजे देसाई


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

कर्जत/जामखेड ः पोलिसांच्या तपासासाठी सीसीटीव्ही व मोबाईल हे अत्यंत महत्वाचे ठरत आहेत असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री शंभूराज भोसले यांनी व्यक्त केले. आ रोहित पवार हे आगामी चार वर्षे व पुढील अनेक टर्म आपल्याला ते लाभणार आहेत त्याचे कडून जास्तीत जास्त लाभ कसा करून घेता येईल याकडे लक्ष द्या असे आवाहन ही देसाई यांनी केले. कर्जत व जामखेड येथील पोलीस वसाहतीचे भूमीपूजन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. रोहित पवार होते.
   श्री देसाई पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीने पोलिसांच्या घराकडे सर्वात प्रथम लक्ष दिले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असो, त्याचे पोलिसांकडे लक्ष आहे, पोलिसांवर कामाचा मोठा ताण असतो, सगळी कामे पोलिसांकडेच असतात, पोलीस किती काम करतात हे मात्र कुणी पाहत नाहीत, कोरोनाच्या काळात सर्वात मोठे काम पोलिसांनी केले. अशा पोलिसांना आपण काही सुखसुविधा दिल्या पाहिजेत यासाठी सर्वात प्रथम आ रोहित पवार यांनी आपल्या मतदार संघात पोलीस वसाहतीसाठी पाठपुरावा केला आ रोहित पवार यांनी अत्यंत विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन काम सुरु केले असून मतदार संघातील कामासाठी मंत्रालयात ही ते अत्यंत चिकाटीने प्रत्येकाकडे पाठपुरावा करतात असे सांगत आगामी काळात या मतदार संघात नोकरी करण्या साठी पोलिसासह शासकीय कर्मचार्‍यांमध्ये चढाओढ लागेल असा विश्वास व्यक्त केले.
   यावेळी आ रोहित पवार यांनी बोलताना तालुक्याचा विकास करायचा असेल तर चांगले अधिकारी आले पाहिजेत पण ते चांगले काम करताना त्यांना घर पण चांगले असले पाहिजे, असे म्हणत यासाठी विविध शासकीय कर्मचार्‍यांसाठी आपण घरे बांधणार आहोत त्याची सुरुवात पोलीस वसाहती पासून याची सुरुवात आपण केली आहे. सर्वाचा भरोसा जिंकण्या साठी भरोसा सेल सुरू केला आहे. लवकरच शहरात सीसीटीव्ही बसविले जातील यासह मिरजगाव व खर्डा याठिकानी स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर होत आहे असे पवार यांनी जाहीर केले
   जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी पाटील म्हणाले की, गेली 10-12 वर्षा पासून घराची मागणी पूर्ण होत आहे यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या प्रयत्नामुळे पूर्वी तालुक्यात जायला तयार नसलेले पोलीस आता कर्जतला जाण्यासाठी अर्ज करत आहेत असे म्हणत भरोसा सेलचा महिला, मुली, जेष्ठनागरिक यांना लाभ होणार आहे. भरोसा सेलच्या माध्यमातून नवा चाप्टर राज्यात सुरू झाला  आहे, यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आ.रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी बारामती ऍग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , अर्चना नष्टे, नानासाहेब आगळे,चंद्रशेखर यादव, सभापती अश्विनी कानगुडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर, बळीराम यादव, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक शहाणे,  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, शहरअध्यक्ष सुनील शेलार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, राजेंद्र गुंड, अशोक जायभाय, दिलीप जाधव, महिला आघाडी शहराध्यक्षा मनीषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, राजेश्वरी तनपुरे, अभय बोरा भास्कर भैलूमे, सतीश पाटील, बापूसाहेब नेटके, बिभीषण खोसे, अशोक डोंगरे, रज्जाक झारेकरी, बाबा भिसे, आदी सह मान्यवर पोलीस होमगार्ड, कॉलेजच्या मुली व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उप विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी  सर्वाचे आभार मानले.
    जामखेड येथील भूमिपूजन प्रसंगी सरचिटणीस राजेंद्र कोठारी, दत्ता भाऊ वारे, मधुकर अब्बा राळेभात, सुर्यकांत नाना मोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, रमेश दादा आजबे, उमर कुरेशी, नगराध्यक्ष निखिल आपा घायतडक, जमीर सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment