मराठा समाजाचे सामुदायिक विवाह सोहळे होणे काळाची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

मराठा समाजाचे सामुदायिक विवाह सोहळे होणे काळाची गरज

 मराठा समाजाचे सामुदायिक विवाह सोहळे होणे काळाची गरज

सकल मराठा सोयरीक डॉट कॉम संकेतस्थळाचे उद्घाटन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः प्रत्येक समाजातील युवक युवतींचे एखाद्या पदावर गेल्यावर आपल्या मागच्या जीवनातील इतिहास व काळा विसरला नाही पाहिजे. आपल्याला घराण्यात आपल्या आई-वडिलांचे कष्ट कामाला येते, आपल्या जीवनाचे आधार आई वडील असतात. प्रत्येक समाजाने एकत्र येऊन आपल्या समाजासाठी योगदान दिले पाहिजे. समाजामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे.वधु-वर परिचय मेळाव्यात च्या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम होते व त्या माध्यमातून एकमेकांमध्ये आपुलकीचे नाते तयार होते. राजमाता जिजाऊ मराठा वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम केले गेले आहे. मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा हा सामुदायिक विवाह सोहळा होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन अहमदनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता संपतदादा बारस्कर यांनी व्यक्त केले.
   राजमाता जिजाऊ मराठा वधू वर   मंडळाच्या वतीने मराठा वधु-वर पालक परिचय मेळावा प्रसंगी संपतदादा बारस्कर बोलत होते.. यावेळी सभागृह नेता कुमारभाऊ वाकळे, नगरसेवक बाळासाहेब पवार, विनोद पाऊलबुद्धे, निखिल वारे, सागर बोरुडे, जिजाऊ ब्रिगेडच्या संपदा सावंत, सकल मराठा सोयरीक फेडरेशनचे राज्य समन्वयक जयकिसन वाघपाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव गुंजाळ होते.या वेळी नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले की, समाजामुळे आपण सर्वजण घडलो आहोत. वधू-वर परिचय मेळाव्यातून  समाज एकत्र येण्याचे काम होते. आज मुला-मुलींनी लग्नासाठी पगार, नोकरी, पेक्षा माणूस विचार व मन पहिले पाहिजे याला आपल्या संस्काराची जोड दिली पाहिजे तेव्हाच आपला संसार यशस्वी होऊ शकतो असे ते म्हणाले.यावेळी अध्यक्षपदावरून विठ्ठलराव गुंजाळ पुढे म्हणाले की लग्न सोहळा हा समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला समाजातील उपजाती त्याकाळात संपला आहे आता हे बंद करून मराठा समाजाची सद्यःस्थिती विषयी व मेळाव्याची हेतू बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
   यावेळी सकल मराठा सोयरीक फेडरेशनच्या वतीने मराठा नायक  पुरस्कार राजमाता जिजाऊ वधुवर मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ जगताप यांना देण्यात आला व जयकिसन वाघपाटील यांच्या संकल्पनेतून सोयरीक फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध वधु-वर सुचक केंद्र आणि विवाह संस्था, सोशल मीडियावरील वधु-वर मंडळाचे एडमिन यांना एकत्रित करून ना नफा ना तोटा ना एजंट या आधारावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट सकल मराठा सोयरीक डॉट कॉम या संकेतस्थळाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या संकेत स्थळाच्या माध्यमातून  राज्यातील विविध वधू वर सुचक केंद्रातील व विवाह संस्थेतील वधू-वर नोंदणी एकत्रित संकलित केली जाणार असून समाजातील विवाह इच्छुक वधूवरांनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लक्ष्मण मडके, विनोद वांडेकर, माया जगताप, शितल चव्हाण, नंदा वराळे, आशा साठे, आयोध्या जगताप, सुवर्णा सरमाने, रोहिणी वाघमारे, राजश्री मिसाळ,मुक्ता तेलोरे,कल्पना जाधव,सागर नवथर, आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी उपस्थित वधु-वरांना सानेटायझर,मास्क चे वाटप करुन सोशलडिस्टन चे सर्व नियमांचे पालन करण्यात आले.या   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब वाकचौरे यांनी केले तर राजेश सरमाने यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment