अवैध व्यावसायिकांनी घेतला बेलवंडी पोलिसांचा धसका - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

अवैध व्यावसायिकांनी घेतला बेलवंडी पोलिसांचा धसका

 अवैध व्यावसायिकांनी घेतला बेलवंडी पोलिसांचा धसका

पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांची दबंग कारवाई
मागील काही दिवसापूर्वी कारवाईचा फार्स करीत हप्त्याचा बिदागी घेण्यात बेलवंडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व्यस्त असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू होती मात्र पो.नि.संपतराव शिंदे यांनी अवैध व्यवसायाला चाप लावण्याचा प्रयत्न सुरु केला असून यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्या बरोबरच अवैध वाळू उपसा तसेच वाळू वाहतूक सुरु होती. मात्र पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांची बेलवंडी पोलीस ठाण्यात नियुक्ती होऊन ते हजार होताच त्यांनी अवैध धंदे चालकांवर तसेच अवैध वाळू उपसा तसेच वाळू वाहतूक करणार्‍याविरोधात दुचाकीवर फिरून धडाकेबाज कारवाई सुरु केल्याने अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या हप्ता बंद कारवाईमुळे बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसापासून जुगार, मटका बेकायदा दारु विक्री या अवैध धंद्या बरोबरच बेसुमार वाळू उपसा तसेच वाळू वाहतूकसारखे अवैध धंदे फोफावले होते. नागरिकांना अवैध धंदे चालकांचा त्रास होत होता. मात्र, ज्यांनी कारवाई करायची तेच, अशा धंद्याला आश्रय देत असल्याचे चित्र होते. स्थानिक पोलीस कर्मचार्यांचे अवैध धंदेवाल्यांशी असलेले लागेबांधे लक्षात घेता तक्रार करण्यासही कोणी पुढे येत नव्हता. मात्र मात्र पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांची बेलवंडी पोलीस ठाण्यात नियुक्ती होऊन ते हजार होताच त्यांनी अवैध धंदेचालकांवर धडाकेबाज कारवाई सुरु केली, तसेच घोड नदीपात्रात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा तसेच वाळू वाहतूक करणार्यांच्या विरोधात दुचाकीवरून पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने छापे मारत अवैध वाळू उपसा तसेच वाळू वाहतूक करणार्‍यांवर हजर झाल्यापासून मोठ्या कारवाया केल्याने अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या हप्ता बंद कारवाईमुळे बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment