जिल्ह्यातील सोसायटीच्या चांगल्या कारभारामुळे शेतकर्‍यांना मोठी कर्जमाफी ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

जिल्ह्यातील सोसायटीच्या चांगल्या कारभारामुळे शेतकर्‍यांना मोठी कर्जमाफी ः कर्डिले

 जिल्ह्यातील सोसायटीच्या चांगल्या कारभारामुळे शेतकर्‍यांना मोठी कर्जमाफी ः कर्डिले

मांडवा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः विविध कार्यकारी सोसायटी या शेतकर्‍यांच्या कामधेनू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे काम सोसायट्यांमार्फत केले जाते. शेतकर्‍यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात कर्ज माफी होते. त्याचा लाभ सोसायट्यांचे सचिव व पदधिकार्‍यांनी केलेल्या कामामुळेच मिळतो, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
   नगर तालुक्यातील मांडवा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल संचालक मंडळाचा सत्कार करतांना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते.
   यावेळी संचालक बाळासाहेब निमसे, पंढरीनाथ निमसे, ज्ञानेश्वर निमसे, पांडूरंग निमसे, शिवाजी निमसे, बाळासाहेब निमसे, ज्ञानदेव निमसे, गंगाधर निक्रड, महादेव निक्रड, सुरेखा दत्तात्रय निक्रड, छाया विलास निमसे, जनार्दन गांगुर्डे, संरपच सुभाष निमसे, ग्रामपंचायत सदस्य मिरा नरेंद्र निक्रड, दिलीप पांडूरंग निक्रड बहिरू निमसे, अशोक निमसे, जया आबासाहेब निमसे, भाऊ मज्याबापू निमसे, निर्मला गंगाधर पंडित, आदी उपस्थित होते.
   कर्डिले म्हणाले, मागील वर्षी केंद्र सरकारने नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे 1500 कोटी रूपयांची कर्ज माफी केली. याचे सर्व श्रेय सोसायट्यांचे सचिव व पदाधिकार्‍यांना जाते. त्यांनी केलेल्या कामामुळेच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रक्कमेची कर्ज माफी झाली. मांडवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक सर्वाच्या सहकार्यातून बिनविरोध करून इतर सोसायट्यांसमोर एक आदर्श ठेवला.

No comments:

Post a Comment