कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी

 कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी

प्रशासकीय मान्यतेबरोबरच मार्च 2021 पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश

नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील मागील 3 वर्षापासून रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची सामाजिक कार्यकर्ते सुधीर सयाजीराव लगड व दादासाहेब लगड यांनी भेट घेत लक्ष वेधले असता ना.टोपे यांनी प्रशासकीय मान्यता तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी मार्च 2021 पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला परवानगी मिळाल्यानंतर 28 मे 2018 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठविलेल्या इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्या नुसार 21 जानेवारी 2021 रोजी अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र मार्च 2021 रोजी आलेल्या कोरोना या जागतिक महामारी मूळे निधी उपलब्ध झाला नसल्याने रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडले होते. मागील 3 वर्षापासून रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर सयाजीराव लगड व दादासाहेब लगड यांनी 2 फेब्रुवारी रोजी भेट घेउन लक्ष वेधले असता ना.टोपे यांनी संबंधित विभागाला प्रशासकीय मान्यता तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी मार्च 2021 पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्याने कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सुधीर लगड यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here