एकच किडनी असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा संवर्ग 1 मध्ये समावेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

एकच किडनी असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा संवर्ग 1 मध्ये समावेश

 एकच किडनी असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा संवर्ग 1 मध्ये समावेश

आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः एकच किडनी (मुत्रपिंड) असलेल्या प्राथमिक शिक्षक किंवा त्याच्या जोडीदाराचा विशेष संवर्ग 1 मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी लेखी मागणी केली होती. त्यानुसार ग्रामविकास मंत्री यांनी संवर्ग 1 मध्ये यांचा समावेश करावा असे आदेश ग्रामविकास खात्याला दिले असून आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
   गेल्या अनेक वर्षापासून विविध प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत होती. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून या मागणीला यश आले आहे.जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीच्या सुधारित धोरणामध्ये जन्मापासुन एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले शिक्षक व त्यांचे जोडीदार यांचा विशेष संवर्ग 1 मध्ये समावेश करावा असे निवेदन दिले होते.वरील विषयान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या 15 मे 2014 , 27 फेब्रुवारी 2017 28 मे 2019 च्या शासननिर्णया नुसार जन्मापासुन एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले शिक्षक व त्यांचे जोडीदार यांना बदली प्रक्रियेत प्राधान्य देऊन त्यांचा समावेश विशेष संवर्ग 1 मध्ये केला आहे.त्यामुळे यासंबंधी अनेक प्राथमिक शिक्षकांच्या तक्रारी लेखी स्वरुपात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्याकडे प्राप्त पण झाल्या होत्या व त्याची मागणी पण करण्यात आली होती.त्यानुसार  जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीच्या सुधारित धोरणामध्ये जन्मापासुन एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले शिक्षक व त्यांचे जोडीदार यांचा विशेष संवर्ग 1 मध्ये समावेश करण्यात आल्याबद्दल विविध प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार निलेश लंके यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment