बेलवंडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकार्‍यासह 4 कर्मचारी कोरोनाबाधित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

बेलवंडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकार्‍यासह 4 कर्मचारी कोरोनाबाधित

 बेलवंडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकार्‍यासह 4 कर्मचारी कोरोनाबाधित

तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू

नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले असून मागील काही दिवसात तालुक्यात 45 जणांना कोरोनाची बाधा झाली असून मागील दोन दिवसात बेलवंडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकार्‍यासह 4 कर्मचारी तसेच राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस आणि शेतकर्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याची चाहूल लागली आहे.
   या बाबत सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढले असून तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकासह 4 कर्मचारी तसेच नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांना देखील कोरोनाने घेरले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात मागील काही दिवसात 45 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यातील 8 जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाने आतापर्यंत तालुक्यातील 40 ते 45 जणांचे बळी घेतले आहेत. यामध्ये राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकर्‍यांचा समावेश आहे. आमदार बबनराव पाचपुते, अनिल पाचपुते लालासाहेब फाळके, श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी कोरोनावर मात केली. मात्र आ. पाचपुते यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य सदाआण्णा पाचपुते, व्यावसायिक सतिश पोखर्णा हे कोरोना विरूद्धची लढाई हरले आहेत.
   कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज असून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी माक्स वापरणे आवश्यक असून वेळोवेळी हात धुणे व गर्दीत जाणे टाळावे, तसेच नियमित व्यायाम करून स्वतःची रोगप्रतिबंधक शक्ती वाढवावी असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment