सासर्‍याने केला सूनेवर बलात्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

सासर्‍याने केला सूनेवर बलात्कार.

 सासर्‍याने केला सूनेवर बलात्कार.

बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथे नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार घडला असुन, सासर्‍याने सुनेवर बळजबरी करत तिच्यावर अतिप्रसंग केला याप्रसंगी बेलवंडी पोलीस ठाण्यात सासू सासर्‍यासह एकाच्या विरोधात काल दि.18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असुन याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोर्‍हाडे तपास करीत आहेत.
   याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील रहिवासी असलेली पीडित महिला आपल्या कुटुंबासह राहत होती.दि.10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजणेच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी असलेला तिचा सासरा ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या सोबत लगट करून लागला.त्याच पिडीतीने प्रतिकार केला असता त्याने तु कोणास काही आवाज देऊ नको आवाज ऐकून कोणीही येणार नाही असे सांगत मला जमिनीवर पाडून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.व घडलेला प्रकार कोणाला काही सांगू नको कोणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आई वडिलांना जीवे ठार मारीन असे सांगून निघुन गेला. झालेल्या प्रकाराने घाबरून पीडित महिलेने याबाबत कोणासही काही सांगितले नाही.मात्र घडलेल्या प्रकाराने मानसिक धक्का बसल्याने पिडीत महिलेने दि.16 फेब्रुवारी रोजी घडलेला प्रकार तिने तिचा नवरा, सासु,आणि नंदावा यांना सांगितले असता त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगु नको व आमची बदनामी करू नको व झालेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याने पीडित महिलेने बेलवंडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासू सासरा आणि एक जण असे तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी वेगाने हालचाल करत यातील मुख्य आरोपीला अटक करत न्यायालयासमोर हजार केले तर दोन आरोपी फरार झाले असुन ,याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोर्‍हाडे, पो.हे. कॉ. रावसाहेब शिंदे करीत आहेत.

No comments:

Post a Comment