आ.निलेश लंके यांच्या हस्ते पारनेर मध्ये रयत बाजाराचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

आ.निलेश लंके यांच्या हस्ते पारनेर मध्ये रयत बाजाराचा शुभारंभ

 आ.निलेश लंके यांच्या हस्ते पारनेर मध्ये रयत बाजाराचा शुभारंभ



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

    " विकेल ते पिकेल " या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजारा अंतर्गत बाजारतळ पारनेर येथे  मा.आमदार निलेशजी लंके याच्या हस्ते गुरुवारी, मा.तहसिलदार सौ.ज्योती देवरे, नगरपंचायत मुख्य अधिकारी डॉ.सुनिता कुमावत यांच्या उपस्थितीत या रयत बाजाराचे उद्घाटन संपन्न झाले.

       सदर प्रसंगी गोसावीबाबा शेतकरी गट,पारनेर,बजरंगबली शेतकरी गट,वडनेर हवेली,व राजेशिवाजी शेतकरी गट,करंदी या गटांनी सहभाग घेऊन आपला शेतमाल विक्रीस ठेवला होता.

शेतक-यांना चांगला भाव ग्राहकाला ताजा फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यासाठी “ विकेल ते पिकेल"या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राबविण्यात येत आहे.

    या मध्ये शेतकरी/शेतकरी गट यांना कोणत्याही मध्यस्ती शिवाय ग्राहकांपर्यंत जोडण्यात येत आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी  राहुल झावरे (सरपंच वनकुटे ), श्री.कारभारी पोटघन ,दौलत गांगड,बाळु लंके,बाजीराव कारखिले.व मडळ कृषि अधिकारी,पारनेर श्री.किरण पिसाळ,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,पारनेर,श्री.देवेद्र जाधव,कृषि सहाय्यक, श्री.शुभम काळे.कृषि

विभागाचे कर्मचारी व मोठया संखेने ग्राहक व शेतकरी उपस्थित होते.या अभियाना अंतर्गत तालुक्यातील सर्व शेतकरी गट/शेतकरी यांना या बाबतप्रवृत्त करुन तसेच तालुक्यातील पारनेर, सुपा, निघोज, अळकुटी, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, या

प्रमुख बाजारपेठा बरोबरच इतर असे एकुण १०० रयत बाजार सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे.यामध्ये गावातील मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात येत असुन सर्व शेतकरी

गट/शेतकरी यांना सदर ठिकाणी आपला शेतमाल विक्रीस ठेवावा व ग्राहकांनी प्राध्यान्याने शेतक-यांन कडुनच शेतमाल खरेदी करावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी,पारनेर श्री.विलास

गायकवाड यांनी केले.

No comments:

Post a Comment