भिंगार खून प्रकरणातील वॉन्टेड आरोपी गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 18, 2021

भिंगार खून प्रकरणातील वॉन्टेड आरोपी गजाआड

 भिंगार खून प्रकरणातील वॉन्टेड आरोपी गजाआड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भिंगार परिसरातील मोमीन गल्ली मध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांड मधील आरोपीला आखेर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गजाआड केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि  दि. 21 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 7. 00 वा. सुमारास जावेद शेख, रा. मोमीन गल्ली, भिंगार याने रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे, वय- 35 वर्षे, रा. ब्रम्हतळे, आलमगीर, भिंगार यांस तूला मेलेली बकरी देतो असे सांगून मोमीन गल्लीचे जवळ असलेल्या काटवनामध्ये नेवून त्यास, आमच्या बकर्‍या चोरतोस असे म्हणून जावेद शेख व त्याचे सोबत असलेल्या तीन अनोळखी साथीदारांनी मारहाण करुन जावेद शेख याने रमेश उर्फ रमाकांत काळे यास सोबत आणलेल्या बाटलीमधील काहीतरी विषारी औषध पाजले होते.
   त्यानंतर रमेश उर्फ रमाकांत काळे हा सिटी केअर हॉस्पिटल, अहमदनगर येथे उपचार घेत असताना दुसर्‍या दिवशी मयत झाला होता. सदर घटनेमध्ये तपासांती फिर्यादी श्री. भैय्यासाहेब अशोकराव देशमूख, पोसई, भिंगार कॅम्प पो. स्टे. यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जावेद शेख व त्याचे साथीदाराविरुध्द दि. 20/12/2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
   पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पो कॉ  भाऊसाहेब काळे, विजय कुमार वेठेकर ,ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, शंकर चौधरी ,संदीप दरंदले, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांनी ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here