गुहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा चंद्रे तर उपसरपंचपदी रामा बर्डे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

गुहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा चंद्रे तर उपसरपंचपदी रामा बर्डे

 गुहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा चंद्रे तर उपसरपंचपदी रामा बर्डे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः  गुहा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा गंगाधर चंद्रे यांची सरपंच पदी तर रामा गोरक्षनाथ बर्डे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
     निवडणूक निर्णय अधिकारी कृषी अधिकारी खळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत ही निवड झाली. सरपंचपदासाठी सौ उषा चंद्रे यांच्या अर्जाला श्रीमतीअरुणा मुरलीधर ओहोळ सूचक आहेत तर उपसरपंच रामा बर्डे यांच्या अर्जास सौ .शकीला शौकत सय्यद या सूचक आहेत. या दोन्ही पदांसाठी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी जाहीर केले . गुहा ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या मार्गदर्शना खाली सुरेशशेठ वाबळे यांच्या गटाने 13 पैकी 9 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवत ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या गटाकडे राखली होती.प्रेरणा परीवाराचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे ,अशोक उर्हे ,सुजित वाबळे ,अविनाश ओहोळ,राजेंद्र कोळसे ,संजय शिंदे ,संजय कोळसे ,शौकत भाई सय्यद ,बाळासाहेब आंबेकर ,रामनाथ उर्हे ,नानासाहेब चंद्रे ,शिवाजी उर्हे ,नंदू सौदागर पोपट कोळसे ,बाळासाहेब कोळसे, माजी सरपंच सुमन ताई कोळसे, माजी सभापती मनीषा ताई ओहोळ ,नशीर फिटर ,संतोष पेंटर ,अरुण कोळसे ,कैलास ओहोळ ,गोरक्षनाथ चंद्रे ,डॉ. विजय वाबळे ,अनिल सौदागर ,सागर सोनवणे ,शिवाजी मांजरे ,आप्पासाहेब चंद्रे ,शरद वाबळे ,सचिन कोळसे संजय ओहळ आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment