माळंगी गावात गेली महिनाभर सलग श्रमदान करत केली स्वच्छता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

माळंगी गावात गेली महिनाभर सलग श्रमदान करत केली स्वच्छता

 माळंगी गावात गेली महिनाभर सलग श्रमदान करत केली स्वच्छता


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः माळंगी गावात दररोज श्रमदान करत स्वच्छता करण्याच्या कामास सलग एक महिना पूर्ण केला असून गावातील युवकांनी एकत्र येत माळंगीचे सेवेकरी नावाने अभियान उभारले आहे या माध्यमातुन गावात विविध कामे अनेक युवकांनी एकत्र येत केली आहेत.
    यामध्ये शाळेतील परिसरात  स्वछता, पाणीपुरवठा विहीर स्वच्छता, पाणी फिल्टर परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालय परिसर स्वच्छ करताना जे रस्ते बाभूळ ईतर झाडामुळे बंद होते ते तोडून रस्ते चौक स्वच्छ केले आहेत.
      बाभूळ तोडून त्यातून मिळणारा पैसा झाडांच्या कडेने कट्टे बांधकाम पार बांधणे सुशोभीकरण करणे व ईतर कामे यातून करणार आहोत असे सांगताना पडके वाडे त्याचा दगड बांधकामासाठी जमा करायला सुरुवात केली आहे, त्यामाध्यमातून गावात सुशोभिकरण करण्याचा संकल्प ही या युवकांनी व्यक्त केला आहे. कर्जत शहरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानापासून प्रेरणा घेत आपल्या गावात ही असे आपण करू शकते असे म्हणत सुरू झालेल्या अभियानात अनेकांनी गट तट राजकारण आणि बाजूला ठेवत गावच्या विकासासाठी दररोज सकाळी श्रमदान करून स्वच्छता करण्याला महत्व दिले आहे.
      यामध्ये महेश जगताप, गणेश अडसूळ, गणेश कोकाटे, विशाल जगताप, प्रवीण वाघमारे, हर्षद वाघमारे, आपताप बागवान, मंगेश वाघमारे, कानिफनाथ वाघमारे, मोबिन बागवान, नितीन पिटेकर, जालिंदर डोळस, जाकिर बागवान, सूरज आरसुळ, आदम घोडके, किशोर कोकाटे, अक्षय कोकाटे, मुयर जगताप, अतुल जगताप, केतन जगताप, पंकज वाघमारे, कैलास भुजबळ, विजय मनसुखे, प्रवीण पिटेकर,  सुनील पिटेकर, छगन पिटेकर, विजय जगताप, सचिन वाघमारे, जहांगीर बागवान,  राजेंद्र जगताप, किरण जगताप, भीमराव पवार, दत्ता शेटे, तोहीद बागवान,  लखन वाघमारे, अशोक पिटेकर, संतोष पिटेकर,  स्वप्निल डोळस,  सोमनाथ कोकाटे, जयदीप जगताप, आदी सह अनेक ग्रामस्थ या अभीयानात सहभागी होत आहे.
या युवकांनी सध्या आर्थिक मदतीची गरज असून या साठी दानदात्यांनी पुढे यावे असे आवाहन केले जात आहे.

No comments:

Post a Comment