मोहोज बु.च्या सरपंचपदी सोनाली जाधव तर उपसरपंचपदी रामनाथ डोळसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

मोहोज बु.च्या सरपंचपदी सोनाली जाधव तर उपसरपंचपदी रामनाथ डोळसे

 मोहोज बु.च्या सरपंचपदी सोनाली जाधव तर उपसरपंचपदी रामनाथ डोळसे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

मिरी  ः पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक गावच्या सरपंच पदी सौ.सोनाली विक्रम जाधव तर उपसरपंचपदी रामनाथ लक्ष्मण डोळसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.बुधवारी दुपारी पार पडलेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडी दरम्यान सरपंच पदासाठी सोनाली विक्रम जाधव व अर्जुन तानाजी मचे यांनी तसेच उपसरपंच पदासाठी रामनाथ लक्ष्मण डोळसे यांच्यासह अर्जुन तानाजी मचे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले होते.परंतु निर्धारित वेळेमध्ये अर्जुन तानाजी मचे यांनी सरपंच व उपसरपंच या दोन्ही पदासाठी दाखल केलेले आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सरपंच पदी सौ.सोनाली विक्रम जाधव व उपसरपंचपदी रामनाथ लक्ष्मण डोळसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीप्रसंगी नूतन पदाधिकार्‍यांसह अनिता कराळे, मनीषा कराळे,पार्वती खाडे,दुर्गाबाई वारे यांच्यासह मच्छिंद्र गहिनीनाथ खाडे,अर्जुन तानाजी मचे व लक्ष्मण नामदेव शिरसाट आदी नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
    या निवडीवेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी विजय दगडखैर यांनी कामकाज पाहिले त्यांना ग्रामसेवक विठ्ठल राजळे व तलाठी रामा पारधे यांनी सहकार्य केले.
    यावेळी डॉ.मचे,चेअरमन गहिनीनाथ खाडे,बाबासाहेब मचे,वाल्मीक मचे, विक्रम जाधव,जगन्नाथ कराळे,शंतनू मचे,मारुती शिरसाठ,भीमराज मचे, रघुनाथ खाडे,सतीश खाडे,शरद कराळे,हारुण तांबोळी,सुरेश खाडे, विनोद गायकवाड,गिताराम जाधव, सुरेश औटी,दादासाहेब मचे,जयराम डोळसे, सुखदेव जाधव,बाबासाहेब खाडे, म्हातारदेव खाडे,नवनाथ कराळे, राजू कराळे,शंकर मचे आदींसह मोहोज बु.चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment