आर्यवीर फौंडेशन व अरुण वाळूंज यांच्या बेधडक महाराष्ट्राचे बेधडक कार्य ः गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

आर्यवीर फौंडेशन व अरुण वाळूंज यांच्या बेधडक महाराष्ट्राचे बेधडक कार्य ः गाडगे

 आर्यवीर फौंडेशन व अरुण वाळूंज यांच्या बेधडक महाराष्ट्राचे बेधडक कार्य ः गाडगे

आर्यवीर फौंडेशनच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पत्रकार बांधवांचा सन्मान...


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः विविध नात्यांच्या भावनांचे ओझे घेऊन जगताना आपणास आई वडिलांच्या भावनांची कदर नसते.आपण आपल्या आई वडिलांना गृहीत धरतो.त्यांच्या भावनीक गरजांकडे दुर्लक्ष करतो. या पार्श्र्वभूमीवर वाळूंज परिवाराने मातोश्री शांताबाई वाळूंज यांच्या अभिष्टचितंनाच्या निमित्ताने समाजासमोर,नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांनी केले.
   तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथे वाळूंज परिवार व ग्रामस्थांच्या वतीने मातोश्री शांताबाई वाळूंज अभिष्टचिंतन सोहळा व आर्यवीर फाऊंडेशनच्या उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघमारे होते.त्यावेळी ते बोलत होते.
    ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे,मराराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्तात्रेय गाडगे, उपाध्यक्ष सनी सोनावळे,फिनीक्स युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विलास महाराज लोंढे, सुभाष वाळूंज,पत्रकार विनोद गायकवाड,सतिष ठुबे, भिकाजी धुमाळ, लतिफ राजे, शशिकांत भालेकर, संतोष सोबले, श्रीकांत ठुबे,कारभारी बाबर,राम तांबे, श्रीनिवास शिंदे,अरुण गायकवाड, सुनील नाईकवाडी,माजी सरपंच सरदार शेख, ओमप्रकाश देंडगे, सुनील टोपले,प्रसाद खिलारी आदी उपस्थित होते.
संजय वाघमारे म्हणाले की,तरुण पिढी विविध समाजमाध्यमांद्वारे अभासी जीवन जगत असताना वृध्द माता पित्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या घटना वेदनादायी आहेत.त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत.फिनीक्स युवा प्रतिष्ठान व आनंदसिंधू वृध्दाश्रमाच्या वतीने निराधार माता पित्यांचा सांभाळ केला जातो.वृध्दाश्रमातील माता पित्यांना सहन कराव्या लागलेल्या यातनांतून समाजातील नेमक्या परिस्थीतीचे आकलन होते.या पार्श्र्वभूमीवर कवी,लेखक अरुण वाळूंज व त्यांचा परिवाराने  मातोश्री  शांताबाई यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे वाघमारे म्हणाले.
शरद झावरे म्हणाले की,समाजाच आपण देणे लागतो या भावनेतून कवी अरुण वाळूंज आर्यवीर फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर काम करतात.त्यांच्या ’बेधडक महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणली जाते.पिंपळगाव तूर्क सारख्या ग्रामीण भागातून जाऊन पुण्यासारख्या शहरात सामाजिक काम करण्याचा कवी अरुण वाळूंज यांचा प्रयत्न स्त्यूत्य आहे.पिंपळगाव तूर्कचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पारनेर तालुका पत्रकार संघ सर्वतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही झावरे यांनी दिली.

No comments:

Post a Comment