किंडर किड गेली 25 वर्षे सतत बालकांच्या विकासासाठी कार्यरत आणि कटिबध्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

किंडर किड गेली 25 वर्षे सतत बालकांच्या विकासासाठी कार्यरत आणि कटिबध्द

 किंडर किड गेली 25 वर्षे सतत बालकांच्या विकासासाठी कार्यरत आणि कटिबध्द


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः 25 वर्षांपूर्वी, जेव्हा अहमदनगरमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण तितकेसे विकसित नव्हते तेव्हा येथे शिक्षणाकरिता एक आधुनिक दृष्टी जन्माला आली. श्रीमती कविता काणे यांनी जनरल वैद्य कॉलनीतील ‘द किंडर किड’ या छोट्या पूर्व - प्राथमिक शाळेची स्थापना केली. 25 वर्षांपूर्वी अवघ्या 5 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने सुरु केलेली ’किंडर कीड’ आज साधारण 450 बालचमूंना भावी शिक्षणासाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी प्रसिद्ध झाली असून एक अग्रगण्य आणि सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून ओळखली जात आहे.
मुलांचा सर्वांगीण विकास आणि  त्यासाठी आवश्यक असलेली उत्तम शैक्षणिक पद्धती उपलब्ध करुन देण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन  सुरु केलेली ही शाळा असून पुस्तकांमधून शिकवण्याबरोबरच खेळाद्वारे शिकण्यावर समान भर देण्याचे ह्या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे. वर्षानुवर्षे ही पद्धत काळाच्या कसोटीस खरी उतरली आहे आणि आज किंडर किडचे विद्यार्थी विविध क्षेत्रात यश मिळवित आहेत. कोणी  यशस्वी व्यावसायिक तर कोणी डॉक्टर, कोणी  अभियंता तर कोणी  सैन्य अधिकारी कोणी  व्यापारी तर कोणी  नेते.आपल्या मूलभूत तत्वांशी दृढ असलेली ही शाळा आपल्या विद्यार्थाना मूल्याधिष्ट शिक्षण घेण्यासाठी विविध मार्ग वर्षानुवर्षे विकसित करत, अधिकच समृद्ध झाली आहे.प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देण्याच्या गरजेवर शाळेचा विश्वास आहे आणि शिक्षकांनी प्रत्येक मुलाला वैयक्तिक लक्ष द्यावे ह्याबाबत शाळा  जागरूक असते. हे  मुलांना त्यांच्या गतीने शिकण्यास आणि त्यांच्या सहविद्यार्थ्यांच्या सोबतीने शिकण्यास मदत करते.
    संगीत, कला आणि इतर विषयांसोबत शाळेचे मुक्त नैसर्गिक वातावरण मुलांना हसत खेळत शिक्षण पुरवत त्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण करत आहे. प्रकल्प मेळा, वार्षिक दिन, क्रीडा दिवस, मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा, तसेच एक अनोखा पदवी दिवस येथे दर वर्षी उत्साहात साजरा केला जात असतो आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यांचे श्रेष्ठत्व ओळखले जाते आणि त्यास बक्षीस दिले जाते, तेव्हा दुसरे एकही मूल त्याच्या हुशारीची पावती मिळाल्याखेरीज राहत नाही. ही पद्धत प्रत्येक मुलास आपल्यातसुद्धा काही गुण आहेत हे जाणवून देते.
    विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक अशी भावना निर्माण करते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अलीकडील वैश्विक साथीच्या रोगा मुळे मोठा बदल झाला आहे आणि किंडर किडही त्याला अपवाद नाही. परंतु शाळा नेहमीप्रमाणेच विविध आभासी माध्यमातून(मल्टि मीडिया) मुले त्यांच्या शिक्षणाच्या संपर्कात राहतील ह्या बाबत दक्ष आहे आणि आवश्यक ते बदल करत आहे.मोठी मुले जशी ऑनलाइन वर्गांच्या पद्धतीस प्रतिसाद देतात तशी लहान वयाची मुले समान कार्यपद्धतीस प्रतिसाद देत नाहीत. म्हणून श्रीमती काणे आणि त्यांच्या शाळेतील शिक्षकवर्ग आणि कर्मचार्यांनी मुले आणि पालक यांच्यासह झूमद्वारे साप्ताहिक संवाद साधून प्रत्येक विषय आणि विषयासाठी दररोज व्हिडिओ करण्याचे धोरण तयार केले.
     मुलांसाठी नृत्य ,कविता आणि इतर अनेक स्पर्धा सातत्याने घेतल्या जातात. मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी झूम आणि इतर मजेदार संवादांद्वारे कथा सांगणे चालू ठेवले आहे. शिक्षकांसाठी देखील ही एक कठीण वेळ होती, विशेषत: या वैश्विक साथीच्या सुरूवातीच्या काळास. व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना कॅमेरासमोर असण्याची सवय नव्हती आणि बर्याच टेक आणि रीटेक घेतल्या ( जणू काही मूव्ही शूटिंग!). परंतु आता कॅमेरासमोर शिक्षकवर्ग अत्यंत कुशलपणे आणि आत्मविश्वासाने हे सर्व करत आहे आणि व्हिडिओ आणि झूम सत्र खूप चांगले चालले आहेत. खरं तर, आमच्या शिक्षकांची सर्जनशीलता आणि ते ज्या प्रकारे आव्हान घेण्यासाठी सज्ज आहेत ते कौतुकास्पद आहे, असे  मुख्याध्यापक म्हणतात.आणि या साथीच्या रोगांदरम्यान हे आभासी (व्हर्चुअल) शिक्षण हा एक उत्तम पर्याय आहे. एकदा शाळा वर्गांसाठी उघडण्यास सक्षम झाल्यास (आशा आहे की पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय परवानगीच्या आधारे हे शक्य होईल ) आधी 2020 वर्षातील वर्गाचे तपशीलवार अवलोकन करून आधीच्या वर्गाची उजळणी केली जाऊन पुढील वर्गाच्या शैक्षणिक गोष्टी सुरू केले जाईल असं मुख्याध्यापक म्हणतात.
ज्या ऊर्जेने गेल्या 25 वर्षात शाळा  विविध उद्दिष्टे साध्य करत अनेक टप्यातून आजच्या ह्या स्थितीस पाहोचली आहे त्याचप्रमाणे आम्ही अशा साथीच्या वेळेस अगदी  तेच ध्येय लक्षात ठेवू. आम्ही अत्यंत आशादायी असून आणि नव्या धोरणानुसार उत्तम सज्ज आहोत.  2021 च्या नवीन शैक्षणिक वर्षात मध्ये शाळा पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने आणि उत्साहाने वाट पाहत आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here