श्रीराम मंदिरासाठी माझी एक वीट असावी ही भक्तांची भावना ः रामदासी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

श्रीराम मंदिरासाठी माझी एक वीट असावी ही भक्तांची भावना ः रामदासी

 श्रीराम मंदिरासाठी माझी एक वीट असावी ही भक्तांची भावना ः रामदासी

सिव्हिल हडको गणेश चौक येथे ”श्रीराम श्रद्धानिधी संकलन अभियानाचा शुभारंभ    

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः 500 वर्षाच्या  संघर्षानंतर  श्रीराम मंदिर होत आहे.76 लढाया झाल्या.तीन लाखाहून अधिक कारसेवकांनी बलिदान दिले.मंदिर निर्माण कार्यास प्रांरंभ झाला आहे.सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.   प्रत्येकाला असे वाटते कि राम मंदिरासाठी माझी एक वीट असावी हि रामभक्तांची भावना आहे..श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानास नाकरीक उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत.हि पिढी भाग्यवान आहे.श्रीराम मंदिर निर्माणच्या सुवर्णक्षणाचे आपण साक्षीदार आहोत.असे प्रतिपादन अभियानाचे जिल्हा सहसंयोजक अनिल रामदासी यांनी केले.सिव्हिल हडको गणेश चौक येथील श्रीराम मंदिरात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र  श्रद्धानिधी संकलन अभियानाचा शुभारंभ माजी नगरसेविका श्रीमती कलावती शेळके यांच्या हस्ते श्रीराम निधीच्या कुपन पावत्यांचे पुजन करून करण्यात आले.
   यावेळी अभियानाचे जिल्हा सहसंयोजक अनिल रामदासी,काका शेळके,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख अमोल भांबरकर,श्री.मते सर,विवेकानंद नगर सहकार्यवाह वैष्णव मोरे,प्रसाद कुलकर्णी,ऋषिकेश जोशी, संजय गटणे,कुलदीप कुलकर्णी,पप्पू शेळके,रवी राऊत,अथर्व बागडे,प्रवीण भांड,संग्राम शेळके,अथर्व गंगावणे,केदार हजारे, गवळी मावशी,अनुराग कचरे,ईशान बल्लाळ,चि.कृष्णा रामदासी आदींसह रामभक्त,स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.या निधी संकलन अभियानास स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here