राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी पारनेर महाविद्यालयातील विद्यार्थिनीची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 25, 2021

राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी पारनेर महाविद्यालयातील विद्यार्थिनीची निवड

 राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी पारनेर महाविद्यालयातील विद्यार्थिनीची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर येथील न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर या कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील कु कदम ऋतुजा आप्पा या विद्यार्थ्यीनीने नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून तिची निवड राजस्थान येथे होणार्या राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी झालेली आहे.
तिच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे साहेब, सेक्रेटरी जी डी खानदेशे साहेब, पारनेर पंचायत समिती चे माजी सभापती राहुलभैय्या झावरे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ दिलिपराव ठुबे, कार्यालयीन अधिक्षक श्री सुनिल चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा सुनिल घोलप, एन सी सी विभागप्रमुख प्रा भरत डगळे, वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा संजय गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ ने अभिनंदन केले.
   सदर विद्यार्थ्यीनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा  गंगाराम खोडदे यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी उपस्थित प्रा .संदीप जमधडे, प्रा.विलास शिंदे, श्रीमती आगरकर, श्रीमती घुले मॅडम व श्री सुभाष बर्डे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here