ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त नेवाशात काँग्रेसचा मेळावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त नेवाशात काँग्रेसचा मेळावा

 ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त नेवाशात काँग्रेसचा मेळावा

कोरोना योध्याना केले सन्मानित


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजिवनी देणार्या राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस राज्यभरात विविध उपक्रम राबवून साजरा केला जात आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने कांग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी काँग्रेस बळकटी करण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.

नेवासा काँग्रेसच्या वतीने देखिल यानिमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन शहरातील प्रणाम हॉल येथे करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते राजेंद्र नागवडे हे होते. कार्यक्रमावेळी नागवडे यांनी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे व ना.थोरात यांना  मुख्यमंत्री करण्यासाठी तयार राहावे असे स्पष्ट केले वाढदिवसानिमित्त साजरा केला जात असलेल्या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत नेवासा येथे आयोजित
काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दि.1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान राज्यात काँग्रेस बळकटीकरण सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नेवासा येथील प्रणाम हॉलमध्ये काँग्रेसकार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र नागवडे होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष कार्लस साठे, सरचिटणीस गणपतराव सांगळे, सुदामराव कदम, अंकुश कानडे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, नेवासा प्रभारी ज्ञानेश्वर मुरकुटे, युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, एस.सी.विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे स्वागत काँग्रेसचे नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचा नेवासा काँग्रेसच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री.नागवडे यांनी राज्यातील सध्याचे राजकारण विषद केले. ना.थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे राज्यात काँग्रेसला सत्तेची संधी मिळाल्याचे नमूद करुन प्राप्त परिस्थितीचा अचूक फायदा घेऊन कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट केल्यास आगामी काळात त्यांना मुख्यमंत्री पद मिळणे मुळीच अशक्य नसल्याचे सांगितले.यावेळी बोलताना सचिन गुजर यांनी नेवासा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची पक्ष वाढीसाठीची धडपड कौतुकास्पद असल्याचे सांगून राज्याचे नेतृत्व आपल्या जिल्ह्यात आहे हे काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाग्यच असल्याचे नमूद केले. नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी जिल्हा कमिटी भक्कमपणे उभी असल्याने तालुका काँग्रेसमय करण्यासाठी झपाटून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ज्ञानदेव वाफारे यावेळी बोलताना म्हणाले की, निवडणूकीच्या राजकारणातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय कार्यकर्ता घडत नसल्याने यापुढील काळात तालुक्यातील प्रत्येक निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःला सज्ज करावे.
याप्रसंगी कोविड-19च्या संवेदनशील काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी योगदान देणार्या नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सुर्यवंशी, ठाणे अंमलदार तुळशीराम गीते, आशा सेविका उमा गायकवाड, पत्रकार शंकर नाबदे, सुहास पठाडे, अभिषेक गाडेकर, काँग्रेसचे नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव तसेच वडाळा बहिरोबा येथील सामाजिक कार्यकर्ते जयवंत मोटे यांचा नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहायक फौजदार पदावरुन नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या बाळासाहेब घुगरकर यांचा उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा सेक्रेटरी सुदमराव कदम,जगन्नाथ कोरडे,  जेष्ठ सदस्य रमेश जाधव, किसान विभागाचे अध्यक्ष साहेबराव पवार,शहराध्यक्ष रंजन जाधव, नेवासा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील भोगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संघटक संदीप मोटे, मिडीया तालुका प्रमुख सचिन बोर्डे, अल्पसंख्यांक अध्यक्ष तनवीर शेख, अपंग विभागाचे नंदू कडु, नंदू कांबळे,कार्यध्यक्ष सुरेंद्र मंडलिक, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष चंद्रशेखर कडू,एससी विभाग कार्यध्यक्ष कमलेश गायकवाड,सतिष तर्‍हाळ,चंद्रकांत पवार, रमेश काळे, अनिल सकट,  युवकचे कार्याध्यक्ष आकाश धनवटे, एनएसयुआयचे अध्यक्ष सौरभ कसावणे, समिर शेख,अस्लम सय्यद,अक्षय फुगे, अभिषेक गायकवाड, निलेश आवटे आदींनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर अंकुश कानडे यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment