आधुनिक संशोधनातून कॅन्सरवरही प्रभावी उपचार शक्य : डॉ.सुनिल पोखर्णा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

आधुनिक संशोधनातून कॅन्सरवरही प्रभावी उपचार शक्य : डॉ.सुनिल पोखर्णा

 आधुनिक संशोधनातून कॅन्सरवरही प्रभावी उपचार शक्य : डॉ.सुनिल पोखर्णा

जागतिक कॅन्सर दिनानिमित्त डॉ. गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबीर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. व्यसनाधीनता, सकस आहाराचा अभाव अशा अनेक कारणांमुळे इतर व्याधींबरोबरच कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. असं असलं तरी आधुनिक संशोधनातून कॅन्सरवरही प्रभावी उपचार शक्य झाले आहेत. यासाठी वेळीच अचूक निदान होणे गरजेचे आहे.
नगरमध्ये डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील अतिशय उत्तम उपचार सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आता कॅन्सरवरील उपचारासाठी मोठ्या महानगरात जाण्याची गरज नाही. डॉ.गरूड यांचा प्रदीर्घ अनुभव कॅन्सर रूग्णांना नवीन जीवन देत आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनिल पोखर्णा यांनी केले.जागतिक कर्करोग दिनानिमित्त दि.4 फेब्रुवारी रोजी नगरमधील डॉ.गरूड हॉस्पिटल व अहमदनगर कॅन्सर सेंटर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.पोखर्णा बोलत होते.
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज घुगे, डॉ.मयूर मुथा, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे, सेक्रेटरी दिगंबर रोकडे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ.प्रकाश गरूड, लेडीज कॅन्सर तज्ज्ञ डॉ.पद्मजा गरुड,  रेडिओ थेरपी तज्ज्ञ डॉ.जगदीश शेजूळ, अमेरिकन व्हेरियन रेडिओ थेरपी मशिन कंपनीचे अधिकारी राहुल उंबरकर, हॉस्पिटलचे सी.ई.ओ.ड.अभय राजे, डॉ.अजिता गरूड-शिंदे, डॉ.योगेश गरूड, ज्येष्ठ महिला रूग्ण पुष्षा डागा आदी उपस्थित होते. डागा यांनी 20 वर्षांपासून गरूड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत कॅन्सरवर यशस्वी मात केली आहे. त्यांचा डॉ.पोखर्णा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.डॉ.प्रकाश गरूड यांनी सांगितले की,शहरातील नगर-मनमाड रोडवरील डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटल 35 वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार करीत आहे. येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर केमोथेरपी, रेडियोथेरपी, मॅमोग्राफी तपासणी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन आरोग्य विमा योजनेंर्तगत रेडिओ थेरपीसह कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार  मोफत उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रेडिओथेरपी लाईटसह कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी हे सर्व उपचार मोफत केले जातात.
डॉ.पद्मजा गरूड म्हणाल्या की, कॅन्सर प्रतिबंध व चांगले उपचार आवश्यक बाब आहे. विशेषतः महिलांनी याबाबत अधिक सतर्क राहिले पाहिजे. किरकोळ वाटणारी तक्रारही दुर्लक्षित करू नये. नियमितपणे तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवावे. राहुल उंबरकर यांनी सांगितले की, अमेरिकेतील सर्वात आधुनिक अशी अमेरिकन व्हेरियन रेडिओ थेरपी मशिन गरूड हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. यांचा रूग्णांना मोठा फायदा होत आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगतात गरूड हॉस्पिटलमधील कॅन्सरवरील आधुनिक उपचार सुविधांचे कोतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ड.अभय राजे यांनी केले. दिगंबर रोकडे यांनी आभार मानले. या शिबिराचा जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील अनेक रूग्णांनी लाभ घेतला.

No comments:

Post a Comment