डॉ. विखे फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयात आळींबी प्रकल्प सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

डॉ. विखे फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयात आळींबी प्रकल्प सुरू

 डॉ. विखे फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयात आळींबी प्रकल्प सुरू


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषि महाविद्यालय, विळद घाट येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये आळिंबी उत्पादन प्रकल्प, दुग्धशास्त्र व दुग्धजन्यपदार्थ, भाजीपाला, माती परीक्षण यांचा समावेश आहे. कार्यानुभव शिक्षण उपकमातुन महाविद्यालयातिल  कल्याणी औटी, अर्चना भांबरे,सबिया देशमुख, ऋतुजा राक्षे, ऋतुजा आटोळे, प्रियांका लांडे, निकिता खेवरे, मयुरी निमसे, आरती कुरंदले, पूजा गवांदे, माधुरी कर्डिले, मधुश्री बत्तीन, मोनाली पवार, तुषार गलांडे, ओंकार लगड, दानिश राजे, अजिंक्य धरम, कुणाल धाडगे, अमोल काळे यांची
आळिंबी उत्पादन प्रकल्प कार्यनुभवासाठी निवड झाली आहे.
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे सर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आळिंबी पिकाची माहिती देतांना प्रा. एस.बी. डमाळ म्हणाले की, आळिंबी प्रक्रिया उत्पादनाला मोठा वाव असून त्याचा फायदा उत्पादकांना होणार आहे. आळिंबी म्हणजे अँगरीकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय, या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व फळास आळिंबी किंवा भूच्छत्र  असे म्हणतात. तसेच इंग्रजीमध्ये ’र्चीीहीेेा असे म्हणतात. आळिंबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. धिंगरी आंळिबीस शिपला आंळिंबी किवा ओयस्टर मशरूम असे संबोधले जाते. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करू शकतात. धिंगरी ही सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी मशरूमची जात आहे.
पौष्टिक महत्व ओल्या अळिंबी मध्ये प्रथिने-2.78 टक्के, स्निग्ध-0.65 टक्के, पिष्टमय पदार्थ-4.4 टक्के, खनिजे-0.97 टक्के, तंतुमय पदार्थ-1.08 टक्के, पाणी- 90 टक्के असते. खनिजापैकी पालाश स्फुरद कॅल्शीयम लोह सोडीअम इत्यादी घटक आहेत. आळिंबीतील प्रथिनामध्ये शरीरात पोषक व आवश्यक त्या सर्व अमिनो अम्लाचा समावेश असून ती भाजीपाल्यातील प्रथिनापेक्षा उच्च प्रतिची व पचनास हलकी असतात. तसेच अमिनो अम्लापैकी ट्रिप्टोफन लायसीन आणि मिथोनाईन मोठया प्रमाणात असतात. जीवनसत्व ’ब-1, ब-2 व क’ याचे प्रमाणही इतर अन्नघटकापेक्षा जास्त आहे. आळिंबीत असणा-या विविध औषधी गुणधर्मामध्ये प्रामुख्याने लठ्ठपणा उच्च रक्तदाब हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, फुफ्फुसाचे रोग, विषाणूजण्य व जिवाणूजण्य रोग प्रतिबंधास अगर उपरचारास विशेष उपयोग होतो. त्यामुळे आहारातील वापर व वैद्यकीयदृष्टया धिंगरी आळिबीस अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आळिंबीस हेल्थ फुड’ म्हणून आहारात महत्वाचे स्थान आहे.
या उपक्रमाचे संस्थेचे सेक्रेटरी जनरल लेप्टं. जन (निवृत्त) डॉ. बी. सदानंदा, संचालक (तंत्र) डॉ. पी.एम. गायकवाड, उपसंचालक (तंत्र) प्रा. सुनिल कल्हापुरे यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment