केंद्र सरकार जनतेचा जगण्याचा हक्क नाकारतंय ः माळवदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

केंद्र सरकार जनतेचा जगण्याचा हक्क नाकारतंय ः माळवदे

 केंद्र सरकार जनतेचा जगण्याचा हक्क नाकारतंय ः माळवदे

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे नेवासा फाट्यावर ’विश्वासघात’ आंदोलन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा फाटा ः गगनभेदी इंधन दरवाढ झाल्याने देशात महागाईचा विस्फोट झालेला असून ती आटोक्यात आणण्याची कुठलीही उपाययोजना नसलेले केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेचा जगण्याचा हक्कच नाकारत असल्याचा संशय नेवासा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी व्यक्त केलाआहे.
   इंधन दरवाढीविरोधात नेवासा तालुका काँग्रेस आयोजित ’विश्वासघात’ आंदोलनप्रसंगी माळवदे बोलत होते. नेवासा तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, एस.सी., अल्पसंख्यांक, अपंग तसेच सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेवासा फाट्यावरील भोसले पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकार तसेच इंधन दरवाढीविरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी आंदोलकांसमोर बोलताना माळवदे यांनी इंधन दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध करुन महागाईच्या आगीत होरपळणार्‍या सर्वसामान्य जनेतच्या आक्रोषाकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा सडेतोड आरोप त्यांना केला. देशातील मूठभर भांडवलदारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटीबद्ध झाल्याचे नमूद करुन त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येऊन बेरोजगारीत भरमसाठ वाढ झाल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने अजूनही सावरुन धोरणांत बदल न केल्यास सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत होऊन देशात अराजक माजण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
   आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, सरचिटणीस सुदाम कदम, एस.सी.विभाग जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तनवीर शेख, एस.सी.विभाग तालुकाध्यक्ष नंदकुमार कांबळे, सांस्कृतिक विभाग तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कडू, युवकचे कार्याध्यक्ष आ्रकाश धनवटे, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष सौरभ कसावणे, उपाध्यक्ष समिर शेख, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनील भोगे, संघटक संदीप मोटे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, प्रसिद्धी प्रमुख सचिन बोर्डे, तसेच बादल परदेशी, लखन वाल्हेकर, शंकर गव्हाणे, सागर वंजारे, सौरभ निपुंगे, विकी भगत, रामकृष्ण भापकर, आतिष धनवटे, प्रतिक पवार, स्वप्नील कडू, रामेश्वर चेमटे, अक्षय ठुबे, भारत शरणागत, सोमनाथ कणगरे, सनी झीने, आनंद उंदरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. नेवासा पोलीस ठाण्याचे  पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, प्रशांत भराट, किरण गायकवाड यांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारले.

No comments:

Post a Comment