आध्यात्मिक संक्रांती हळदीकुंकु समारंभात राजयोगा मेडिटेशनची गहन अनुभुती व स्त्रीजन्माचे स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

आध्यात्मिक संक्रांती हळदीकुंकु समारंभात राजयोगा मेडिटेशनची गहन अनुभुती व स्त्रीजन्माचे स्वागत

 आध्यात्मिक संक्रांती हळदीकुंकु समारंभात राजयोगा मेडिटेशनची गहन अनुभुती व स्त्रीजन्माचे स्वागत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः येथील साईबनमें मधुबन गीतापाठशाला अंतर्गत राजयोगा हिलर गु्रपच्या वतीने संघटीत आगळीवेगळी आध्यात्मिक संक्रांती साजरी करण्यात आली. साई सूर्य नेत्रसेवा या दालनात सदर समारंभ संपन्न झाला यात सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक महिला, भगिनी, माता सहभागी झाल्या होत्या.
   संक्रांती म्हणजे सकारात्मक क्रांती, परिवर्तन करण्याचा काळ आहे. जगात चालू असलेल्या करोना महामारी, सहीत अनेक आजारांवर मात करून आरोग्यदायीमध्ये जीवन परिवर्तन करणे म्हणजे संक्रांती, अनेकता मध्ये एकता व मिठास आणणारा हा तिळगुळाचा लाडू, टेन्शनमुक्त-चिंतामुक्त राहून आनंदाने उडण्याचे बळ देणारा पतंग महोत्सव म्हणजे संक्रांती! असे प्रतिपादन सुप्रसिध्द नेत्रतज्ञ आणि राजयोगा जीवनपध्दतीच्या अभ्यासक डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. समाजाला घातक असणार्या रूढी परंपरांना परिवर्तीत करणे म्हणजे संक्रांती! मुलीला पराया धन समजून मुलीच्या जन्माला नकार देणे म्हणजे समाजामध्ये असमतोलपणा निर्माण करणे होय याला परिवर्तीत करून स्त्रीजन्माचे स्वागत करण्याची भुमिका स्विकारणे म्हणजे खरी सकारात्मक क्रांती अर्थात संक्रांती! असे ही त्या म्हणाल्या. सदर समारंभात फक्त मुली असणार्या माता भगिनी परिवारांचा सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी सौ पुनम कुलकर्णी, डॉ. अमृता भोसले, सौ भारती गांधी, स्नेहल छाजेड, कु. रिध्दी कुलकर्णी यांनी राजयोगा मेडिटेशनमुळे त्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल व त्यांना आलेले अनुभव कथन केले. संगीत सौभद्र संगीत नाटकातील अभिनेत्री कु. रिध्दी कुलकर्णी यांनी बहारदार गीत सादर केले आणि प्रेक्षकांची वाह वा मिळविली. शाल, श्रीफळ, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन तिचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्वांना हळदी कुंकुम, तिळगुळचा लाडू, आर्युवेदीक काढा देण्यात आला व तुळशी रोपाचे वाण देण्यात आले. सर्वांनी, राजयोगा मेडिटेशनचा साप्ताहिक कोर्स घेण्याविषयीचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहाला मान देऊन येत्या 22 फेब्रु ते 26 फेब्रु पर्यंत रोज संध्याकाळी 6.30 ते 8 या वेळात माणिक चौकातील साई सूर्य नेत्रसेवा येथे राजयोगाचा कोर्स घेण्यात येणार आहे. सदर कोर्स मोफत असून त्यासाठी नांवनोंदणी करणे मात्र आवश्यक आहे. नांवनोंदणीसाठी कृपया 9850887838 या नंबरवर संपर्क साधावा. कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करावे.

No comments:

Post a Comment