राहुल मांढरे यांनी कर्जतमधील स्वच्छता अभियानाला दिली 40 हजाराची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

राहुल मांढरे यांनी कर्जतमधील स्वच्छता अभियानाला दिली 40 हजाराची मदत

 राहुल मांढरे यांनी कर्जतमधील स्वच्छता अभियानाला दिली 40 हजाराची मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः रोहित दादा युथ फाउंडेशन महाराष्ट्र या ग्रुप  सदस्य राहुल मांढरे (युवा व्यवसायिक पुणे) यांनी कर्जत मध्ये चालू असलेले स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सुरू असलेले काम ऐकून काही सदस्यांकडून ह्या कामाची माहिती घेतली या युवकाला वाटलं की आपण ही या चळवळीला स्वत: येऊन वेळ देऊन श्रमदान करू शकत नाहीत परंतु आपण  थोडी फार आर्थिक मदत करू शकतो व त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले कर्जत येथे ते उपस्थित नव्हते परंतु आमदार रोहित दादा पवार ह्याचे हस्ते 40000/- रुपयांचा चेक नगर पंचायतचे मुख्याधीकारी गोविंद जाधव यांच्या कडे सुपूर्द केला. आपण समाजाच्याचे काही तरी देणं लागतो हीच भावना डोळ्यासमोर ठेऊन काम करणारे  राहुल मांढरे यांना याबाबत सविस्तर माहिती देण्याचे काम या श्रमदानात दररोज सक्रिय राहून अग्रेसर असणारे राहुल नवले यांनी केले अनेक श्रम प्रेमींनी दोघांचे ही विशेष कौतुक केले आहे. यावेळी गेली 138 दिवस कर्जत शहरात श्रमदान करणारे सर्व सामाजीक संघटनांचे श्रमप्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment