‘महावितरण’ला झटका! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

‘महावितरण’ला झटका!

 ‘महावितरण’ला झटका!

सावेडी, तेलीखुंट पॉवर हाऊसवर भाजपाचे टाळे ठोक आंदोलन



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्यभरात महावितरण वीज कंपनीने राज्यातील 75 लाख ग्राहकांना आपल्या घरातील लाईट चे कनेक्शन तोडण्याची नोटीस दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता अंधारात ढकली जाणार अ ाहे . या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकाच वेळेस आंदोलन करीत असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. भाजपाच्यावतीने महापौर वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी प्रोफेसर चौकातील महाविरण कार्यालयात व उपमहापौर मालनताई ढोणे, मध्य मंडल नगर शहर अध्यक्ष अजय चितळे यांनी महावितरणच्या तेलीखुंट येथील कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार आंदोलन केले.

सरकारने 12 युनिट वीज बिल माफ केले पाहिजेत आणि सुधारित बिलांबाबत नोटीस दिली पाहिजे सरकारने जवळपास 72 लाख जनतेची मीटर कापण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्यातील कमीत कमी 4 कोटी नागरिक अंधारात येणार आहेत. राज्य सरकार मुघलांसारखे इंग्रजांसारखे वागत आहे. म्हणून आम्ही या सरकारविरोधात, मुख्यमंत्र्यांविरोधा आंदोलन करतो आहे, असे उपमहापौर मालन ताई ढोणे यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते की, राज्यातील शेतकर्‍यांचे पैसे माफ केले. शेतकर्‍यांचे तर मागील पाच काळात आम्ही वीजकनेक्शन कधीच कापले नाही. हजारो कोटी थकित असतानाही आम्ही शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापले नाही किंवा शेतकर्‍यांकडे पैसे मागितले नाहीत. परंतु राज्य सरकार शेतकर्‍यांना 50 टक्के पैसे भरा असे सांगत आहे. ग्रामपंचायतमध्ये पत्रक आले की, जो पैसे वसूल करेल त्याला 10 टक्के कमिशन देऊ. हे सरकार कमिशनवर चालणारे सरकार आहे.
कोरोना काळात संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झालेला होता, याचा फायदा घेऊन महावितरण वीज कंपनीने नागरिकांना अंदाजे बिल टाकून त्याचे वाटप केले. सदरचे बिल 3 ते 4 महिन्या चे एकत्रित असल्यामुळे त्याचा आपोआपच बोजा नागरिकांवर आला. लॉक डाऊन च्या काळात अनेक नागरिकांचे हातचे काम गेले अनेक नागरिक बेरोजगार झाले. त्यातच महावितरण वीज कंपनीचा हा दंडेलशाही चा कार्यक्रम चालू आहे. नगर शहरांमधील ज्या नागरिकांना वीज कनेक्शन तोडण्याबाबत ची नोटीस आलेली असेल त्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सदरचे बिल चुकीचे आहे की बरोबर आहे, हे महावितरण कार्यालयात जाऊन तपासून घ्यावे. त्यासाठी महावितरण वीज कंपनीने स्वतंत्र कक्ष सुरू करावा, जर नागरिकांकडे एकरकमी पैसे भरण्यासाठी नसेल तर महावितरण वीज कंपनीने त्यांना यासाठी बिलाची रक्कम पाहून आठ ते दहा हप्ते पाडून द्यावेत, असे अजय चितळे म्हणाले.
आंदोलनावेळी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, सभागृहनेते मनोज दुल्लम, अजय चितळे, सुधीर पोटे, उदय कराळे, सतीश शिंदे, अजय ढोणे, अभिजीत ढोणे, अभिजीत चिप्पा, राहुल कवडे, अतुल दातरंगे, सचिन वाघ, अजय राऊत, अमित पाथरकर, रोहीत मुळे, आशिष आनेचा, सचिन कुलकर्णी, रोशन गांधी, प्रशांत चितळे, संतोष लोंढे, अमित किर्तने, डॉ. दर्शन करमाळकर, भूषण अंभोरे, महेश हेडा, गोपाल वर्मा, आदेश गायकवाड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment