इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार!

 इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बैलगाडीवर आंदोलन

आज राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र दिसून आले. कारण, शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आज वेगवेगळ्या विषयांवर आंदोलनं केली. शिवसेनेनं केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढी विरोधात तर भाजपाने वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला आज घेरण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शिवसेनेने आज राज्यभर मोर्चे काढले. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेनं केंद्र सरकारविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन केलं आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या काळात शिवसेना लोकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याची नीती केंद्रसरकारकडे नसल्यामुळे महागाईच्या समस्ये मधून सर्वसामान्य जनतेला बाहेर काढण्यासाठी शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यव्यापी आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत असे प्रतिपादन शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले.

नगर शिवसेनेच्या वतीने  पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर शिवसेनेच्या वतीने बैलगाडी वर येऊन  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली. याप्रसंगी गाडे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर हल्ला चढविला यावेळी दिलीप सातपुते म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे अवाजवी पद्धतीने भाव वाढ केली आहे सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये विष कालावण्याचा  प्रयत्न हे सरकार करत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इंधन दरवाढीचा भाव पन्नास टक्के होऊन खाली आलेला असतानादेखील 80 ते 90 रुपये लिटर इंधन दरवाढ हे सरकार करत आहे  हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ होत आहे.
या आंदोलनामध्ये  केंद्र सरकार व मोदी सरकारचा निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामध्ये  शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक श्याम नळकांडे, अनिल शिंदे, संदेश कार्ले, मदन आढाव ,अमोल येवले, गिरीश जाधव , भगवान फुलसौंदर, गणेश बोरूडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, शरद झोडगे, संजय आव्हाड, महिला आघाडीचे अशा निंबाळकर आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment