’कोविड-19 महामारीतून काय शिकलो?’ या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

’कोविड-19 महामारीतून काय शिकलो?’ या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धा

 ’कोविड-19 महामारीतून काय शिकलो?’ या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धा

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्यावतीने आयोजन
नगर : मागील वर्षी संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणार्या करोना महामारीमुळे प्रत्येकाला जीवनशैलीचा विचार करणे भाग पडले.महामारीमुळे लॉकडाऊन करावं लागले आणि सगळेच व्यवहार ठप्प झाले. विद्यार्थी वर्गालाही शाळेऐवजी घरी राहून शिक्षण घ्यावे लागले. करोनामुळे    काही चांगले बदलही अंगवळणी पडले. याच अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी च्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ’कोविड-19 महामारीतून काय शिकलो?’ या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती अध्यक्षा गिता गिल्डा यांनी दिली.
   रोटरीच्या सचिव देविका रेळे यांनी सांगितले की, निबंध स्पर्धेत इयत्ता 8वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. निबंधासाठी 500 शब्दांची मर्यादा असून निबंध मराठी भाषेत सादर करायचा आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 1000 रुपये, द्वितीय क्रमांकास 750 रूपये तर तृतीय क्रमांकास 500 रुपये तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण 20 फेब्रुवारी नंतर होणार असून विजेत्यांना दूरध्वनीवरून निकाल कळवण्यात येईल तसेच वर्तमानपत्रातूनही निकाल जाहीर केला जाईल.
   सांस्कृतिक विभाग प्रमुख शांता येळंबकर यांनी सांगितले की, स्पर्धेसाठी निबंध सादर करायची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी पर्यंत आहे. निबंधासोबत स्पर्धकांनी पूर्ण नाव, इयत्ता, शाळेचे नाव, संपर्क क्रमांक द्यायचा आहे. स्पर्धेचा  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन व्यक्त व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. निबंध पाठवण्यासाठी ई-मेल ीेींरीू.रहाशवपरसरीिीळूरवरीीहळपळसारळश्र.लेा संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 0241-2345226

No comments:

Post a Comment