नागरिकांच्या सोयीसाठी साई मंदिरात पोलिओ केंद्र ः त्र्यंबके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

नागरिकांच्या सोयीसाठी साई मंदिरात पोलिओ केंद्र ः त्र्यंबके

 नागरिकांच्या सोयीसाठी साई मंदिरात पोलिओ केंद्र ः त्र्यंबके


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः भारत पोलिओमुक्त आहे, पण काही देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने तो पुन्हा येऊ शकतो, त्यासाठी ‘दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी‘ या ब्रीद वाक्याचा विचार करुनच भाविक व स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी वसंत टेकडी येथील साई मंदिरात पोलिओ डोस देण्यासाठी केंद्र सुरु केले असे, प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
   अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ मोहिमेत साई संघर्ष प्रतिष्ठानने सहभाग घेऊन पोलिओ केंद्रास सहकार्य केले. यावेळी बालकास पोलिओ डोस देऊन त्र्यंबके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, आरोग्य विभागाचे डॉ.गणेश मोहोळकर, कर्मचारी हर्षदा खरात, स्नेहल साळवे, स्वाती कांबळे, वैशाली आनंदकर, सुनिता चौधरी, मिनाक्षी मोरे उपस्थित होते.
रविवारी 100 टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न होता, पण तरीही काही नागरिक वंचित राहतात, त्यांच्या सोयीसाठी पुढील पाच दिवस पोलिओ देण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी जवळील पेट्रोल पंपावर सोय करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment