मिरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी,मिरवणुक रद्द झाल्याने शिवप्रेमींचा हिरमोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

मिरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी,मिरवणुक रद्द झाल्याने शिवप्रेमींचा हिरमोड

 मिरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी,मिरवणुक रद्द झाल्याने शिवप्रेमींचा हिरमोड

नगरी दवंडी/प्रतिनिधी
मिरी:
येथील सर्व शिवप्रेमी युवकांनी एकत्र येऊन बसस्थानक परिसरात शिवजयंती मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरी केली.यानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मिरवणुक रद्द करावी लागल्याने सर्व शिवप्रेमींमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

   शिवजयंती निमित्त मिरी बसस्थानक परीसरात भव्य दिव्य असा नयनरम्य देखावा तयार करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती.शुक्रवारी सकाळी आरती झाल्यानंतर विविध क्षेत्रातील सर्वधर्मीय शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करून अभिवादन केले. यांसह मिरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात देखील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.सायंकाळी शिवजयंती निमित्त ढोल-ताशाच्या निनादात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून मिळालेल्या आदेशानुसार मिरवणूक सुरू होण्याच्या अगोदरच पोलीस कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप करून मिरवणुकिला विरोध दर्शवला.त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून मिरवणूक रद्द करण्यात आल्याने सर्व शिवप्रेमींचा उत्साह कमी झाला.व सर्वत्र नाराजी पसरली होती. परंतु सायंकाळी माऊली भजन संध्याच्या वतीने सादर करण्यात आलेल्या बहारदार शिव गितांमुळे कार्यक्रमाला रंगत येऊन तरुणांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.शेवटी महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    यानिमित्त संपूर्ण गावात भगवे झेंडे लावण्यात आले होते व परिसरातील सर्वच शिवप्रेमी युवकांनी भगवे फेटे परीधान केले होते.त्यामुळे संपुर्ण वातावरण भगवेमय झाल्याचे पहायला मिळाले.यावेळी शिवप्रेमी युवक व मिरी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

No comments:

Post a Comment