महामारीप्रमाणेच रस्ते अपघात रोखण्यासाठीही नियमांचे काटेकोर पालन आवश्यक : डॉ.सुनिल पोखर्णा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

महामारीप्रमाणेच रस्ते अपघात रोखण्यासाठीही नियमांचे काटेकोर पालन आवश्यक : डॉ.सुनिल पोखर्णा

 महामारीप्रमाणेच रस्ते अपघात रोखण्यासाठीही नियमांचे काटेकोर पालन आवश्यक : डॉ.सुनिल पोखर्णा

रस्ते सुरक्षा अभियान समारोपप्रसंगी रोटरी सेंट्रलतर्फे मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबीर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःकोविड काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्यांनी आरोग्य यंत्रणेला मोलाची साथ दिली आहे. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलनेही कोविड काळात कोविड केअर सेंटर चालवून महामारीशी लढण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महामारीप्रमाणेच आपण रस्ते अपघात रोखण्यासाठीही सतर्क राहिले पाहिजे. यासाठी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन प्रत्येकाने केले पाहिजे. नियमांचे पालन करूनच आपण आपले स्वास्थ्य जपू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखर्णा यांनी केले.

   नगरमध्ये आयोजित रस्ते सुरक्षा अभियानाचा समारोप उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराने झाला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.पोखर्णा बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील होते. कार्यक्रमास आरटीओचे अधिकारी विनोद घनवट, श्रीराम पुंडे, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सेके्रटरी ईश्वर बोरा, नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रसन्न खणकर, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.गुलशन गुप्ता, राजेश परदेशी, अजय गांधी, चेतन अमरापूकर, उमेश रेखे आदी उपस्थित होते. या शिबिरात डॉ.खणकर यांनी नेत्र तपासणी करून नेत्र आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रक्तसंकलनासाठी जनकल्याण रक्तपेढीच्या टिमने सहकार्य केले.

   दीपक पाटील म्हणाले की, यावर्षी रस्ते सुरक्षा अभियान संपूर्ण महिनाभर राबविण्यात आले. यानिमित्त समारोपाला नेत्रतपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजनासाठी रोटरी सेंट्रलने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. कोणतेही अभियान यशस्वी करण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असतो. रस्ते सुरक्षा ही निरंतर प्रक्रिया आहे. घराबाहेर पडल्यापासून प्रत्येकाने कायम काळजी घेतली पाहिजे. दुचाकीवर असताना हेल्मेट वापर, कारमध्ये असताना सिटबेल्ट वापरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. आपण घेतलेली काळजी आपल्या कुटुंबियांसाठीही महत्त्वाची असते. कारण काळजी घेतल्यानेच आपण सुरक्षित राहू शकतो. वाहतूकीचे नियम हे कर्तव्य म्हणून पाळले पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.

   प्रसन्न खाजगीवाले म्हणाले की, रोटरी क्लब नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. वर्षाची सुरुवात रस्ते सुरक्षा अभियानात सक्रिय सहभाग होवून केली आहे. वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी भविष्यातही आरटीओशी हातात हात घालून काम करण्याचा प्रयत्न राहिल. लवकरच रोटरीतर्फे मोफत जयपूर फूटचे शिबिर घेण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

   प्रास्ताविकात ईश्वर बोरा यांनी सांगितले की, शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असते. रस्ते सुरक्षा अभियानात आरटीओच्या अधिकार्यांनी सर्वांना समावून घेत व्यापक काम केले आहे. रोटरीच्या माध्यमातून कोविड काळात चालविण्यात येणार्या कोविड केअर सेंटरला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पोखर्णा यांनी मोलाची साथ देत मार्गदर्शन केले. आज येथे रक्तदान केलेले रक्तदातेही कौतुकास पात्र असून त्यांनी मानवतेचे मोठे कार्य केले आहे. शिबिरातील रक्तदात्यांना रोटरीतर्फे प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment