जिल्हाधिकारी भोसलेंनी सुरु केलेले महसुल विजय सप्तपदी अभियान राज्याला दिशादर्शक -शरद पवळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

जिल्हाधिकारी भोसलेंनी सुरु केलेले महसुल विजय सप्तपदी अभियान राज्याला दिशादर्शक -शरद पवळे

 जिल्हाधिकारी भोसलेंनी सुरु केलेले महसुल विजय सप्तपदी अभियान राज्याला दिशादर्शक -शरद पवळे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शतरस्ते पिडीत शेतकर्यांनी राज्याला प्रेरणादायी चळवळ शेतकर्यांनी एकत्र येत शेतकर्यांचा शेतरस्त्यांचा मार्ग मोकळा करावा यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत निवदने देवुन विविध आंदोलनाच्या माध्यमातुन प्रशासणाचे लक्ष वेधण्याचे काम पारनेर तालुक्यात केले असुन शेतकर्यांचा दळणवळणाचा प्रश्न पाण्याइतकाच महत्वाचा आहे.
     यामध्ये अनेक शेतकर्यांनी कोर्टाच्या पायर्या झिझवल्या असुन अनेकांनी जमिनी गमावल्या आहेत यासाठी प्रशासणाचा नाकर्तेपणा शेतकर्यांच्या संघर्षाला कारणीभुत असुन पारनेर तालुक्यातील शेतकर्यांनी जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपाणंद शतरस्ते नवनिर्माण कृती समितीने राज्यव्यापी आवाज दो जनआंदोलनाची जनजागृती कण्यास आरंभ केला असुन पाकमंत्र्यांसह, जिल्हाधिकार्यांना शेतरस्ते खुले करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी महसुल विजय सप्तपदी अभियानाच्या माध्यमातुन शिवपाणंद शेतरस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला निर्णय महत्वपुर्ण आहे.
      शेतकर्यांनी यापुर्वीही अनेक अर्ज निवेदनांना केराची टोपली मिळाली असली तरी शेतकर्यांनी पुन्हा नव्याने महसुल विभागाकडे सप्तपदी अभियानात शेतरस्त्यांचे अर्ज निवेदने द्यावीत न्याय मिळाल्यास जिल्हाधिकार्यांचे शिवपाणंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समीतीकडुन स्वागत करण्यात येणार असुन पुन्हा फसवणुक झाल्यास मंत्रालयासमोर आवाज दो जनआंदोलन उभारुन न्याय मिळवु असे मत शिवपाणंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीचे शरद पवळे, संजय कनिच्छे, रघुनाथ कुलकर्णी, भास्कर शिंदे, सुर्यकांत साहलके, आदिंनी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here