राशीनजवळील सावडी येथे काळूबाईचा गणमाळ उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

राशीनजवळील सावडी येथे काळूबाईचा गणमाळ उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा

 राशीनजवळील सावडी येथे काळूबाईचा गणमाळ उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राशीन गावापासून जवळ असलेल्या सावडी या गावात काळूबाईचा गनमाळ उत्सव खूप मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
   या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे खूप वर्षांपासून चालत आलेल्या प्रथेनुसार भाविक पेटत्या विस्तवाच्या निखार्‍यावर चालतात. तसेच ज्या महिलांच्या अंगामध्ये देवी संचारते त्याही कोणतेच भान न ठेवता त्या विस्तवावर नाचत असतात परंतु तरीही कोणत्याही प्रकारची इजा त्यां महिलांना होत नाही. काळूबाईच्या भक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन या महिला  आपल्या अंगामध्ये संचारलेल्या देवीला  अधीन जातात आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांनंतर पुन्हा आपल्या जगात रममाण होतात. या ठिकाणी काळुबाईला प्रसाद म्हणून बोल्हाइचा बळी देऊन त्याची कंदुरी,भाकरी,भात जेवण नैवेद्य म्हणून दिले जाते. प्रथम पाच सवाष्णींना जेवू घातले जाते.
    भाविकांच्या जीवनात येणा-या अनेक अडीअडचणींवर याठिकाणी पुजार्‍याकडून तोडगा सांगितला जातो. त्यांनी सांगितलेल्या तोडग्यानुसार भाविक विधिवत पूजा अर्चा करून समाधानाने घरी जातात आणि या ठिकाणाहून सकारात्मक ऊर्जा घेऊन आपले पुढील जीवन व्यतीत करतात. आपापली भावनिक धार्मिकता जपत असतांनाच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये गल्लत होणार नाही याचीही काळजी घेतली जाते.  
   महाराष्ट्रभरातून आलेले भाविक येथे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या देवस्थानला पुजारी म्हणून रघुनाथ तात्या एकाड हे खूप वर्षांपासून याठिकाणी काम पाहतात. तर वाद्यवृंद वादक मंडळी म्हणून पांडुरंग काळे,परशू सोमासे  ,दत्ता काळे,युवराज काळे  आदी मंडळी संबळ वाजविण्याचे उत्कृष्ट काम करतात .तसेच या कार्यक्रमाला मीनाताई अशोक सिन्नरकर, रोहित, भूषण, सायली, मोनाताई सिन्नरकर परिवार, तसेच इंदारे परिवार, बुर्‍हाडे परिवार, रसाळ परिवार आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here