हळदीकुंकवाच्या पारंपरिक कार्यक्रमात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

हळदीकुंकवाच्या पारंपरिक कार्यक्रमात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन

 हळदीकुंकवाच्या पारंपरिक कार्यक्रमात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन

कर्जतमध्ये अभय बोरांचा स्तुत्य उपक्रम

नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः हळदीकुंकवाच्या पारंपरिक कार्यक्रमात मोतीबिंदू शिबिरा सारखा उपक्रम घेऊन नाविन्यपूर्ण कल्पना लढविणार्या सुसंस्कृत कुटुंबियांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे गौरवोद्गार सौ सुनंदाताई पवार यांनी काढले कर्जत येथे अभय क्लॉथच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे प्रसंगी मोतीबिंदू शिबिराचे आयोजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
   मोतीबिंदू हा सर्वसामान्य आजार होऊ लागला असून त्यावर उपचार होणे अत्यंत गरजेचे असल्याने अभय सुमतीलाल बोरा यांच्या अभय क्लॉथच्या वतीने  आनंदऋषीजी नेत्रालयच्या सहकार्याने मोतीबिंदू आरोग्य नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन अभय सांस्कृतिक भवन कर्जत येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत अभय बोरा यांनी केले  यावेळी विशाल मेहेत्रे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, ऍड बापूसाहेब चव्हाण,  आदींनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी कर्जत जामखेड इंटिग्रेटेड फांऊंडेशन च्या संचालिका सौ सुनंदाताई पवार यांनी बोलताना एक सुसंस्कृत कर्जत घडत असताना कर्जतकर अशा चांगल्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे  उभे राहतील व शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व एक वेगळं वातावरण निर्माण होण्यासाठी सर्वजण सहकार्य करतील याबाबत माझ्या मनात शंका नाही असे उदगार काढले.
   याप्रसंगी गुरुवर्य अमृतराव खराडे गुरुजी, लिलाबाई बोरा, बहिरोबावाडीचे सरपंच विजय काका तोरडमल, सुनील शेलार, डॉ शबनम इनामदार, बापूसाहेब नेटके, ऍड संजय गवारे, नितीन देशमुख, भास्कर भैलूमे, बापूसाहेब रानमाळ मेजर, कालिदास शिंदे, राजू बागवान, श्रीकांत मारकड मेजर, सत्यवान शिंदे मेजर,  राहुल नवले, घनश्याम नाळे, काकासाहेब काकडे, रज्जाक झारेकरी, निरंजन काळे, आशिष शेटे, वरद मेहेत्रे, शेरखान पठाण, कचरे, प्रदीप काळसाईत, पृथ्वीराज चव्हाण, सुदाम धांडे, आदी सह अनेक जण उपस्थित होते.  शेवटी आशिष बोरा यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश दिवटे यांनी केले. मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे प्रसंगी सौ गीता अभय बोरा, कु सुनंदा बोरा व कु अनिता बोरा यांनी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले.

No comments:

Post a Comment