शरीफजीराजेंच्या समाधीला अभिवादन करून गडकिल्ले मोहिमेस प्रारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 16, 2021

शरीफजीराजेंच्या समाधीला अभिवादन करून गडकिल्ले मोहिमेस प्रारंभ

 शरीफजीराजेंच्या समाधीला अभिवादन करून गडकिल्ले मोहिमेस प्रारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः मराठा सेवा संघ पाथर्डी तालुका यांच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवदुर्ग अभिवादन मोहीम (पाच दिवस पाच  किल्ले) राबविण्यात आली आहे.
   12 फेब्रुवारी रोजी सकाळी  पाथर्डी येथे  शिवदुर्ग रथ पूजन करण्यात आले असून 9.30 वाजता नगर तालुक्यातील  शौर्य भुमी असलेल्या भातोडी येथील शूरवीर शरीफजी राजे भोसलेंच्या  समाधीस  अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रात्री  सिन्नर येथे मुक्काम केला असून 13 फेब्रुवारी रोजी विश्रांत गड  माहुली  येथे मुक्काम करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी रोजी कील्ले माहुली  - नामधारी निजामशाही म्हणजेच शहाजी राज्यांच्या पहिल्या स्वराज्याचा अस्त) इगतपुरी - क्षेत्र त्र्यंबकेश्वर मुक्काम करण्यात येणार आहे.
दि.15 रोजी  किल्ले हरीहर नाशिक येथे मुक्काम  करण्यात येणार आहे.  दि.16 ला  कील्ले रामशेज ( छत्रपती संभाजी राज्यांच्या मार्ग दर्शनाखाली  सतत सहा वर्षे मुघलांनी वेढा देऊनही मर्द मराठा मावळ्यांनी  अजिंक्य   ठेवलेला किल्ला)  - यानंतर पाथर्डी येथे मोहिमेची सांगता होणार आहे. या दरम्यान शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सोनावळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. या मोहिमेचे जिल्हा भरातून कौतुक केले जात आहे. मोहिमेसाठी भातोडी गावातूनही शिवभक्त बंडू गायकवाड, विक्रम गायकवाड, घनश्याम राऊत, भाऊसाहेब धलपे आदींचे सहकार्य मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here