नवनागापूरचा पाणीप्रश्न मार्गी लावणार ः सरपंच डॉ. डोंगरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

नवनागापूरचा पाणीप्रश्न मार्गी लावणार ः सरपंच डॉ. डोंगरे

 नवनागापूरचा पाणीप्रश्न मार्गी लावणार ः सरपंच डॉ. डोंगरे

नवनागापूरच्या सरपंच डॉ.श्री.बबनराव डोंगरे व उपसरपंच मा.सौ.संगीताताई सप्रे यांनी पदभार स्विकारला

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नवनागापुर मधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकर या भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या भागाला एमआयडीसी पाणी योजनेतून पाणी मिळत आहे. ही योजना गेल्या 40 वर्षापूर्वीची असल्यामुळे वारंवार नादुरूस्त होत आहे. त्यामुळे नवनागापूरचा पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. याच बरोबर सर्वांच्या सहकार्यातून गावच्या विकासाला चालना देणार आहे. नवनागापूर गांवचा विकास आराखडा तयार करून नियोजन पूर्वक टप्प्या टप्प्याने कामे मार्गी लावू असे प्रतिपादन सरपंच डॉ.श्री.बबनराव डोंगरे यांनी म्हटले.

   नवनागापूर ग्रामपंचायत सरपंच डॉ.श्री.बबनराव डोंगर उपसरपंच मा.सौ.संगिताताई सप्रे यांनी आपल्या पदाचा पदभार छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून घेतला. यावेळी सदस्य महेश काडेकर,गोरक्षनाथ गव्हाणे, मगल गोरे, कल्पना गिते, दिपक गिते, रंजना दांगट, सागर सप्रे, हेमा चव्हाण,सत्यभामा डोंगरे, अर्जुन सुनवणे, राहुल भोर, सुशिला जगताप, संगीता भापकर, स्वाती सप्रे आदी उपस्थित होते.सरपंच मा.डॉ.श्री.बबनराव डोंगरे पुढे म्हणाले की ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजना शेवटच्या घटका पर्यंत घेऊन जाण्याचे काम होते. केंद्रवराज्यसरकारच्या माध्यमातून विविध योजना गावामध्ये राबविण्यात येत असतात. निवडणुका संपल्या की गावाने आपआपसातले मतभेद विसरुन गावच्या विकासाकडे एकजूटीने काम करावे. असे ते म्हणाले.
   उपसंरपंच संगीता सप्रे म्हणाले की, नवनागापूरच्या विकास कामांमध्ये गावांतील महिलांना सामावून घेण्यात येणार आहे. महिलांच्या माध्यमातून लोकसहभागातील विविध योजना सक्षमपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नवनागापूरमध्ये मोठया प्रमाणात वृक्षरोपण व त्याचे संवर्धन करण्यासाठी महिलांच्या माध्यमातून लोकचळवळ उभी करेल असे त्या म्हणाल्या.सरपंच व उपसरपंच यांनी पहिल्याच दिवशी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारून नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविले जातील. नागरिकांना वारंवार ग्रामपंचायतमध्ये येण्याची गरज पडणार नाही असा कारभार करू. माजी उपसरपंच मा.श्री.नरेश शेळके यांनी गांवचा पाणी प्रश्न गंभीर झाला असून लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली.  
   यावेळी ग्रामस्थ दत्तापाटील सप्रे, नरेश शेळके, विजय शेवाळे, योगेश गंलाडे, राजू शेवाळे, हनुमंत कातोरे, सुभाष दांगट, संजय गिते, ज्ञानदेव सप्रे, अशोक शेळके, किशोर वाकळे, शंकर शेळके, नवनाथ गव्हाने, चंद्रभान डोंगरे, संजय चव्हाण, निलेश शेवाळे, सुभाष ठेपे, शिवराज सप्रे, बाबासाहेब दांगट, अर्जुन गोरे, रशिद पठाण, अक्षय पिसे, सुनंदा डोंगरे, रवि वाकळे, महेश गलांडे, बाबासाहेब डोंगरे  आदी सह नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment