निमगाव वाघाच्या सरपंचपदी रुपाली जाधव यांची निवड तर उपसरपंचपदी अलका गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

निमगाव वाघाच्या सरपंचपदी रुपाली जाधव यांची निवड तर उपसरपंचपदी अलका गायकवाड

 निमगाव वाघाच्या सरपंचपदी रुपाली जाधव यांची निवड तर उपसरपंचपदी अलका गायकवाड

सरपंच, उपसरपंचाची एकमताने निवड


अहमदनगर -
निमगाव वाघा (ता. नगर) येथे मंगळवारी (दि.9 फेब्रुवारी) सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. निमगाव वाघाच्या सरपंचपदी रुपाली विजय जाधव तर उपसरपंचपदी अलका भाऊसाहेब गायकवाड यांची एकमताने निवड झाली.निमगाव वाघा ग्रामपंचायतीसाठी मागास प्रवर्गातून महिलेसाठी सरपंच पद राखीव होते. सकाळी 10 वाजता सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया निमगाव वाघाग्रामपंचायतीत पार पडली. हात वर करुन मतदानाची निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी रुपाली जाधव, लता फलके व प्रमिला कापसे यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये प्रमिला कापसे यांनी अर्ज माघार घेतल्याने जाधव व फलके यांच्यामध्ये निवड प्रक्रिया राबविण्यात आली. अकरा सदस्यांपैकी जाधव यांना 6 मते तर फलके यांना 5 मते पडली. यामध्ये रुपाली जाधव एक मतांनी सरपंच पदी निवडून आल्या. उपसरपंचपदासाठी अलका गायकवाड व संजय कापसे यांनी अर्ज दाखल केला. यामध्ये देखील गायकवाड यांना 6 तर कापसे यांना 5 मते पडून, अलका गायकवाड या एक मतांनी उपसरपंचपदी विराजमान झाल्या. सदर निवडणुकीची प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली साळवे, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, कामगार तलाठी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  सरपंच व उपसरपंच पदाची निवड होताच समर्थक कार्यकर्त्यांसह महिलांनी ग्रामपंचायतच्या आवारात गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, प्रमोद जाधव, किरण जाधव, मुन्नाबी शेख, गोकुळ जाधव, साहेबराव बोडखे, अण्णा जाधव, अनिल डोंगरे, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ जाधव, चांद शेख, शंकर गायकवाड, सुखदेव जाधव, भाऊसाहेब जाधव, भरत फलके, मच्छिंद्र कापसे, एकनाथ जाधव, रामदास डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, राहुल शिंदे आदींसह आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. नुतन सरपंचपदी रुपाली जाधव व उपसरपंच अलका गायकवाड यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणार असून, ग्रामस्थांनी व सदस्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment