देडगाव_ माका या रस्त्यावर उस घेऊन जाणारा ट्रक पलटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

देडगाव_ माका या रस्त्यावर उस घेऊन जाणारा ट्रक पलटी

 देडगाव_ माका या रस्त्यावर उस घेऊन जाणारा ट्रक पलटी


माका -
मुळा सहकारी साखर कारखान्यास उस घेऊन जात असता,माका गावठाण जवळ देडगाव_माका या रस्त्यावर उस घेऊन जात असलेली माल वाहतुक ट्रक रस्त्यावरील अडथळयांमुळे किराणा दुकानावरती जागीच पलटी झाली. याबाबत असे की,माका _देडगाव रस्त्यावर माका या ठिकाणी गावठाण लगतच गणेश नांगरे यांच्या राहत्या घराजवळ,किराणा दुकानावरतीच गावातीलच अंबादास  रामभाऊ लोंढें यांची ट्रक देडगाव कडुन उस वाहतुक करत असता,रस्त्यावरील अडथळा,खडी,उंचवट्यांमुळे पलटी झाली.या दुकानात नांगरे यांची पत्नी व मुल होती  जिवितहानी टळली पण,दुकान व किराणा मालाचे आतोनात नुकसान झाले आहे.देडगाव_ माका रस्त्याचे कामकाज बरयाचशा दिवसापासुन चालू असल्याने,विनाकारण रस्त्यावर पडलेल्या आस्ताव्यस्त खडी,वाळु,उंचवटे,खड्डे दगड,या पसारयांमुळे दैनंदिन या रस्त्यावरती अपघातात होत आहेत.याबाबत याअगोदर वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध देखील झाल्या आहेत.तरी या संदर्भात कामगारांशिवाय रस्त्यावर प्रशासकीय अधिकारी,ठेकेदार कधीही फिरकत नसल्याचेही बोलले जात आहे.ठेकेदार तसेच त्यांचे सहकारी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता,संपर्क होत नव्हता.अचानक झालेल्या या प्रकारामुळे यावेळी घटनास्थळी एकदमच गर्दी झाली होती.

No comments:

Post a Comment