गुंडेगाव ग्रामपंचायतमध्ये लोकशाहीचा विजय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

गुंडेगाव ग्रामपंचायतमध्ये लोकशाहीचा विजय

 गुंडेगाव ग्रामपंचायतमध्ये लोकशाहीचा विजय


गुंडेगाव:-
नगर तालुक्यातील गुंडेगाव ग्रामपंचायतींवर रामेश्वर ग्रामविकास पॅनेलची सत्ता आली आसून संरपच पदी सौ.मंगल संतोष सकट ,उपसंरपच पदी संतोष भापकर यांची निवड झाली आसून मागिल पंधरा वर्षे हराळ गटाकडे एक हाती सत्ता होती. पण या वर्षी तरूणांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन सत्ता परिवर्तन केले असून मतदारांनी घराणेशाहीला चाप लावला आसून गुंडेगाव ग्रामपंचायत मध्ये लोकशाहीचा मजबूत पाया निर्माण केला आहे. पुढील काळात विकासाबरोबरच महिला कल्याणकारी,  भयमुक्त गाव पाहण्यासाठी मिळणार आहे आसे मत नवनिर्वाचित संरपच सौ.मंगल सकट यांनी सांगितले आहे.तर युवकांना बरोबर घेऊन गुंडेगावचा कायापालट केला जाणार आसून पुढील काळात स्मार्ट व्हिलेज म्हणून गुंडेगावाची ओळख निर्माण होईल आसे काम उपसंरपच संतोष भापकर यांनी व्यक्त केले आहे. गुंडेगावातील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित संरपच व उपसंरपच यांना शुभेच्छा देत पुढील काळात पारदर्शक कारभार करावा आसे मत व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment